शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डोळखांबजवळील धरण परिसरात डोंगरावर भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:15 IST

तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांनी रौद्ररूप धारण करत शेकडो कुटुंबे रस्त्यावर आणली आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने डोळखांब धरणापासून अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.भूस्खलनामुळे जमीन खचत राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. डोळखांब धरणाच्या बाबतीत या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक होत असलेल्या रस्त्याची बाजू ८ ते १० फूट जमिनीत दबली गेली आहे. तरीही, या धोकादायक रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. येथील एक महाकाय जुना वृक्ष कोलमडून पडला आहे. धरणाच्या पिचिंगला, भिंतींना झाडांनी वेढल्याने या भूस्खलनाने धरणासह नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर लघुपाटबंधारेच्या अखत्यारीत येत असलेल्या ४.४४ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या डोळखांब धरणाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३० जुलै २०१९ रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परंतु, या धरणाच्या बंधाऱ्याला, पिचिंगला झाडांनी वेढल्याने हे धरण कमकुवत झाले आहे. त्यामुळे हे भूस्खलन तिवरे धरणफुटी तर दर्शवत नाही ना, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.गावपाड्यांना धोकाडोळखांब धरणापासून आणि भूस्खलन झालेल्या स्थानापासून काही अंतरावर आदिवासीवाडी आहे. आजूबाजूला डोळखांब शहर, रानविहीर, मधलीवाडी या मुख्य गावांसह इतर काही पाडे असल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या अगोदर कधीही अशी घटना घडली नसल्याने प्रशासनाने याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे.भूस्खलन असेच होत राहिले, तर धरणाला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महसूल आणि जलसंपदा विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.दुभंगलेल्या जमिनीच्या बाजूनेच वाहतूकभूस्खलनाने मोठ्या प्रमाणात जमीन खचली असून मोठे तडे गेले आहेत. जमीन अशीच खचत राहिली तर, डोंगर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी, जीप आदी वाहनांची वर्दळ सुरूच असून, रात्रीअपरात्री रस्ता पुन्हा खचल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस पोलीस यंत्रणेने प्रतिबंध करून पर्यायी व्यवस्था करणेही गरजेचे आहे.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भूस्खलन का आणि कसे झाले, याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येईल. यावर आवश्यक उपाययोजनाही करण्यात येईल. - रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, शहापूरया धरणावर झाडे वाढली आहेत. ती काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, तत्काळ टेंडर काढून ती मोकळी करण्यात येतील. भूस्खलनाची कर्मचारी पाहणी करून अहवाल देणार आहेत. -नवनाथ गोराड, उपअभियंता, लघुपाटबंधारेडोळखांब धरणाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष नसून, या धरणाची सुरक्षा धोक्यात आहे. इथे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहील.- सागर देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत डोळखांब