शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

कल्याणच्या स्वागतयात्रेत एकोप्याचा अभाव, जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:11 IST

गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही. तसेच ही यात्रा सामाजिक उद्देशापासून दुरावली असल्याची नाराजी स्वागतयात्रेचे संस्थापकीय सदस्य भिकू बारस्कर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या यात्रेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.बारस्कर यांनी सांगितले की, डोंबिवलीच्या धर्तीवर कल्याणमध्ये २००१ पासून नववर्ष स्वागतयात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी प्रफुल्ल गवळी हे यात्रेचे अध्यक्ष, तर त्यांच्या सोबतीला सुरेश एकलहरे, राजीव जोशी, प्रा. उदय सामंत व बारस्कर होते. या मंडळींना या उपक्रमात माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या मंडळींची साथ मिळाली. या मंडळींच्या कारकिर्दीत दरवर्षी यात्रेत विविध मान्यवर सहभागी होत होते. त्यात एकावेळेस ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अभिनेत्री निर्मिती सामंत आणि आदेश बांदेकर यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे यात्रेला एक वेगळे वलय प्राप्त झाले होेते.मात्र, कालांतराने हा उत्साह मावळत गेला. त्यातील सामाजिक उद्देश मागे पडला. तसेच एकोपाही राहिला नाही. एकदा तर कल्याणमधील सफाई कामगार असलेल्या रुखी समाजाला गुढी उभारण्याचा मान दिला गेला होता. सर्व समाजांना यात्रेत सहभागी करून घेताना ही यात्रा सर्वांना आपली वाटावी, असा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो नंतरच्या काळात झालेला दिसला नाही. या यात्रेत विविध संस्थांचे प्रबोधनात्मक चित्ररथ सहभागी होत होते. त्यानंतर, विविध व्यापारी व खाजगी क्लासेसचे चित्ररथ सहभागी झाले. त्यातून त्यांची स्वत:चीच जाहिरात सुरू झाली. यात्रा हे जाहिरातबाजीचे साधन झाले. या सगळ्या गोष्टी व बदलते स्वरूप पाहून त्यातून सामाजिक प्रबोधनाचा उद्देश मागे पडत चालल्याचे पाहून बारस्कर व जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात गवळी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, ही यात्रा सुरू राहावी, त्यासाठी निधी गोळा केला जातो. या देणगीच्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जावा, असा त्यामागचा उदात्त हेतू होता. मात्र, यात्रेत माणुसकीच हरवल्याने आम्ही दूर झालो, असे सांगत यात्रेच्या आयोजनाविषयी नाराजीचा सूर बारस्कर यांनी व्यक्त केला आहे.‘मतभेद बाजूला ठेवून संवाद साधायला हवा’यासंदर्भात कल्याण संस्कृती मंचाचे सरचिटणीस श्रीराम देशपांडे म्हणाले, बारस्कर हे संस्थापकीय सदस्य आहेत. मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आमच्याशी बोलले पाहिजे. ते आम्हाला हवे आहेत. मंचातील ज्येष्ठ सदस्यांनी हे वाद मिटवणे गरजेचे होते. बारस्कर यांनी यात्रेत एकोपा राहिला नाही, असे वक्तव्य केले असेल, तर एकोपा नसल्याशिवाय इतकी वर्षे यात्रा निघते का, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.त्याचबरोबर समाजप्रबोधनाऐवजी जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोपही चुकीचा आहे. त्याचे कारण आम्ही विविध संस्थांकडून चित्ररथाचे विषय मागवत असतो. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला आयोजक जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. नव्या संकल्पना राबवण्यास व सांगण्यास कोणाचाही नकार नाही. बारस्कर यांनी पुन्हा यावे, काम करावे, हेच मंचातील सगळ्यांचे मत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणgudhi padwaगुढी पाडवा