शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

गावदेवी मार्केटमधील जागा मर्जीतील बचत गटांना, ठाणे मनपाचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:09 AM

जवळपास १२ वर्षांचा वनवास संपवून आणि त्यासाठी १ कोटी ६१ लाख सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर ठाणे महापालिकेने गावदेवी मार्केटची जागा ताब्यात घेऊन ते उभारण्यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करून नवे सुसज्ज असे मार्केट उभारले.

ठाणे : जवळपास १२ वर्षांचा वनवास संपवून आणि त्यासाठी १ कोटी ६१ लाख सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर ठाणे महापालिकेने गावदेवी मार्केटची जागा ताब्यात घेऊन ते उभारण्यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करून नवे सुसज्ज असे मार्केट उभारले. मात्र, या मार्केटमधील जागा राज्य सरकारची कार्यालये आणि मर्जीतील महिला बचत गटांना देण्याचा सपाटा प्रशासनाने सुरू केल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.अशा प्रकारे मनमानी करणाºया अधिका-यांची चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.ही जागा ताब्यात घेण्यासाठी सरकारकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली होती. एका अधिकाºयाने तर या कामासाठी मंत्रालयात दीडशेच्या आसपास हेलपाटे घातले होते. दरम्यान, या इमारतीच्या पहिल्या आणि दुसºया मजल्यावर प्रत्येकी १३ हजार चौरस फुटांचे दोन प्रशस्त हॉल पालिकेला प्राप्त झाले आहेत.पालिकेने ही इमारत उभारण्यासाठी सव्वासहा कोटींचा निधी खर्च केला आहे. त्यानंतरही पहिल्या मजल्यावरील १३ हजार चौरस फुटांपैकी ९ हजार चौरस फूट जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कौशल्य विकास परिषदेला दिली आहे. त्यापोटी पालिकेच्या तिजोरीत एकही पैसा आलेला नाही. या मजल्यावरील उर्वरित चार हजार चौरस फूट जागेवरही याच संस्थेने आपल्या ताब्यात घेतली आहे. दुसºया मजल्यावरील ३ हजार ५०० चौरस फुटांची जागा उपनिबंधक कार्यालयासाठी कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्यात आली आहे. उर्वरित साडेनऊ हजार चौरस फुटांपैकी साडेतीन हजार चौरस फू ट जागेसाठी पालिकेने निविदा काढली होती.त्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. पालिकेला वार्षिक २० लाख रु पये भाडे देण्याची तयारी दाखवणाºया कॉम्प्युटेक कंपनीची निविदा मंजूर करून तसा करारही पालिकेने केला. मात्र, आता या कंपनीला दिलेली जागा काढून घेऊन ९ हजार चौरस फूट जागा एका महिला बतच गट आणि शेतकरी बाजारासाठी देण्याचा घाट एका अधिकाºयाने घातल्याचे बोलले जात आहे.लोकमान्यनगर येथे पालिकेने सुमारे साडेतीन कोटी रु पये खर्चून महिला बचत गटांसाठी इमारत उभारलेली आहे. ती हक्काची जागा असताना गावदेवी मैदानातील जागा बचत गटांना देण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल केळकरांनी केला आहे. कोणताही मोबदला न घेता मार्केटमधील जागा दिल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या बाबीकडे पालिका आयुक्त लक्ष घालणार का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.निविदा प्रक्रियेने जागा दिल्यास ठामपाला फायदा-ठाणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर गावदेवी भाजी मंडई आहे. पूर्वी या ठिकाणी राज्य सरकारच्या अखत्यारीतील काही गोदामे होती. पालिकेने सरकारी तिजोरीत १ कोटी ६१ लाख रु पये भरून ती जागा ताब्यात घेतली. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागा निविदा प्रक्रि या राबवून बाजारभावाने दिल्या, तर पालिकेच्या तिजोरीत दरमहा लाखो रु पयांचे उत्पन्न पडू शकणार आहे. मात्र, तसे न करता या जागा फुकटात आंदण दिल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका