Labor organization's march on Shahpur Municipal Panchayat; The basics of cleaning workers | शहापूर नगरपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा; सफाई कामगारांचा ठिय्या
शहापूर नगरपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा; सफाई कामगारांचा ठिय्या

शहापूर : नगर पंचायतीतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी श्रमजीवी संघटनेतर्फे शहापूर नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे, सरचिटणीस दशरथ भालके, तालुकाध्यक्ष राजेंद्र म्हसकर, प्रकाश खोडका, सोमा पोकळा, प्रवीण जोगळे, सुमन हिलम, ताराबाई दिवे आदी सहभागी झाले होते.

शहापूर बसस्थानकापासून निघालेला मोर्चा बाजारपेठ मार्गे शहापूर नगरपंचयतीवर आला. यावेळी नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आज जागतिक मानव हक्क दिन असतानाही शहापूर नगरपंचायतीतील सफाई कामगार आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत शिष्टमंडळाने नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊ न संताप व्यक्त केला. यावेी मागण्याचे निवेदनही देण्यात आले.

नगरपंचायतीच्या स्थापनेपासून तर २००८ पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, फेब्रुवारी २०१७ पासून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी कापलेल्या रकमेचा तपशील द्यावा, दरवर्षी बोनस आणि कामगारांना गणवेश आदी मागण्या करण्यात आली आहे. यावेळी सफाई कामगारांचे नगरपंचायत सेवेत समायोजन झाले नाही, तो प्रश्न राज्यस्तरीय आहे. तसेच किमान वेतन फरकाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नगरपंचायतकडून पत्रव्यवहार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तर महिनाभरात साहित्य पुरवण्यात येईल, असे आश्वासन गारवे यांनी दिले.

Web Title: Labor organization's march on Shahpur Municipal Panchayat; The basics of cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.