कामगार नेते बी. एन. सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST2021-06-02T04:29:51+5:302021-06-02T04:29:51+5:30
ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कामगार नेते बी.एन. सिंग यांचे मंगळवारी वयाच्या ७६ व्या वर्षी दीर्घ आजाराने ...

कामगार नेते बी. एन. सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन
ठाणे : ठाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कामगार नेते बी.एन. सिंग यांचे मंगळवारी वयाच्या ७६ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार होता.
बी.एन. सिंग हे जरी राजकारणात सक्रिय होते, तरी त्यांनी जास्तीत जास्त कामगार क्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते. रेमन्ड मिलपासून अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांचे नेतृत्व करून, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. बुधवारी दुपारी १२ वाजता वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ठाणे काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, इंटक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेतली.