शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुमार आयलानी यांनी अधिकाऱ्याची घेतली शाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची बैठकीला उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:48 IST

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता टार्गेटवर

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम सर्वांच्या टार्गेटवर आले असून आ. कुमार आयलानी यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची सोमवारी आमदार कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. महापौर दौऱ्यानंतर रस्त्यातील ३ निकृष्ट ब्लॉक कापून पुन्हा रस्ता बांधण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघड झाला आहे.

 उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. त्यामुळे रस्ता सर्वांच्या टार्गेटवर आला आहे. गेल्या आठवड्यात महापौर अश्विनी निकम यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर, महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे यांच्या सोबत कल्याण ते अंबरनाथ रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त केली होती. महापौरांची नाराजी घालविण्यासाठी बांधकाम विभागाने निकृष्ट झालेले ३ ब्लॉक कापून नव्याने बांधण्यास घेतले आहे. संपूर्ण रस्ता ६८ कोटीच्या निधीतून रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, रस्ता तब्बल दिड फूट उंच झाळा. त्यामुळे दुकाने व घरे रस्त्याच्या खाली गेल्याचा आरोप होत आहे. 

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामाचा दर्जा आणि वेळ पाळणे बंधनकारक आहे. रस्ता बांधल्यानंतर रस्त्याचे ऑडिट करण्याचे संकेतही आ. आयलानी यांनी सोमवारी घेतलेल्या बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदाराच्या बैठकीत दिले. बैठकीला राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर, अनिल पाटील आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी एप्रिल पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगून निकृष्ट काम काढल्याचे म्हणाले.

 कामातील त्रुटींवर ताशेरे रस्ता बांधकामात येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्रुटींकडे आमदार आयलानी यांनी अधिकारी व ठेकेदाराचे लक्ष वेधत, त्या तातडीने सुधारण्याचे निर्देश दिले. रस्ता उंच झाल्याने, रस्ता शेजारील दुकानदारांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी योग्य निचरा व्यवस्था आणि उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता निकृष्ट झाल्याने, निकृष्ट ब्लॉक कापून नव्याने बांधल्याने, रस्तावर टिका होत आहे. 

चौकांचे सुशोभीकरण कल्याण ते अंबरनाथ रस्त्यात येणाऱ्या महत्त्वाच्या चौकांचे बांधकाम अधिक चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. रस्त्याच्या कामात जिथे कुठे जागेचे वाद असतील, ते नियमानुसार लवकरात लवकर सोडवून काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयलानी म्हणाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Ailani Schools Officials Over Ulhasnagar Road Construction Quality

Web Summary : MLA Kumar Ailani criticized officials and contractors regarding the poor quality of the Kalyan-Ambernath road construction in Ulhasnagar. Concerns include substandard blocks, increased road height impacting shops, and the need for improved drainage. Ailani emphasized quality, timely completion, and potential audits.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर