खारेगाव येथील कोविड सेंटरपाणी शिरल्याने २२ रुग्णांना हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:36+5:302021-05-18T04:42:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खारेगाव भागातील भूमिपुत्र मैदानात पुन्हा सुरू केलेल्या कोविड सेंटरला तौक्ते चक्रीवादळाचा फटका ...

The Kovid Center at Kharegaon evacuated 22 patients | खारेगाव येथील कोविड सेंटरपाणी शिरल्याने २२ रुग्णांना हलविले

खारेगाव येथील कोविड सेंटरपाणी शिरल्याने २२ रुग्णांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : खारेगाव भागातील भूमिपुत्र मैदानात पुन्हा सुरू केलेल्या कोविड सेंटरला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचे पाणी शिरू लागल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने येथील २२ रुग्णांना अखेर दुपारनंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये हलविल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठाण्यात मधल्या काळात कळवा, खारेगाव या भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परंतु, येथील रुग्णांना उपचारासाठी थेट ठाण्यात ग्लोबल किंवा पार्किंग प्लाझा येथे रुग्णांना दाखल करावे लागत होते. तसेच सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या नागरिकांना भाईंदरपाडा येथे महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. त्यामुळे कळव्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांसह इतरांनी केली होती. त्यानुसार मागील आठवड्यात ते पुन्हा नव्याने सुरू केले होते. याठिकाणी केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. त्याठिकाणीच हे २२ रुग्ण सध्या उपचारासाठी दाखल होते. मैदानातच हे कोविड सेंटर तात्पुरत्या म्हणजे टेंट स्वरूपात उभारण्यात आले आहे. परंतु सोमवारी झालेल्या पावसाने या सेंटरमध्ये पाणी येऊ लागल्याने अखरे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील सर्वच म्हणजे २२ रुग्णांना तातडीने पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये हलविल्याची माहिती महापालिकेने दिली.

Web Title: The Kovid Center at Kharegaon evacuated 22 patients