कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:40 IST2025-07-28T12:40:47+5:302025-07-28T12:40:47+5:30
१९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवसेना विकास करणारा पक्ष आहे. मुंबईचाही त्यामुळेच विकास होत आहे. कोळीवाड्याचा विकास करण्याचे, रस्ते आणि मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले.
ठाण्यामधील कोरम मॉलजवळील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी रविवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शिंदे यांनीनी पक्षप्रवेश केलेल्या सलमा आलमेलकर, आयशा शेख या माजी नगरसेविकांसह इम्रान शेख, जावेद शेख यांचे स्वागत केले.
तुमच्या भागातील सर्व कामे पूर्ण करू, कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. अनेक वर्ष जी कामे झाली नाही, ती कामेही नक्की पूर्ण हाेतील, असे सांगून मुंबईतील काेळीवाड्याचा विकास करू, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले.
आराेग्य शिबिराचे काैतुक
ठाण्यातील पदाधिकारी शरद कणसे हे आजारी असतानाही त्यांनी आराेग्य शिबिराचे आयाेजन केले हाेते. त्याचा खास उल्लेख करून त्यांनी कणसे यांचे काैतुक केले.