राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची विजेतेपदावर मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 15:17 IST2018-06-18T15:17:58+5:302018-06-18T15:17:58+5:30
पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपट्टनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.

राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची विजेतेपदावर मोहोर
कल्याण- पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.
ठाणो जिल्हयात प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आली. कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आधारवाडी येथे ही स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेसाठी नाशिक, पुणो, औरंगाबाद, सातारा,कोल्हापूर, ठाणो, मुंबई, सोलापूर, बीड अशा 18 जिल्ह्यातून 128 स्पर्धक आले होते. ही स्पर्धा अंध व अस्थिव्यंग मुले व मुली अश्या दोन्ही गटात पार पडली. स्पर्धेसाठी ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर असे तीन गट केले होते. फी स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम अश्या पाच प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेचा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना फायदा होणार आहे. सामान्य खेळाडूप्रमाणोच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यांचे आयोजन केले असल्याचे तिसाई संस्थेचे अध्यक्ष व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.
या स्पर्धेत पुणो संघानी उपविजेतेपद पटकाविले आहे. यजमान ठाणोला तृतीय क्रमांकावर समाधान मानवे लागले. या स्पर्धेत 162 खेळाडूंनी सुवर्णपदक, 79 रौप्य आणि 31 जणांनी कांस्यपदक पटकाविले आहे. आर्यन जोशी याने 6 सुवर्णपदक, सिध्दार्थ सावंत याने 4 रौप्यपदक, गोरख शिंदे याने 4 सुवर्ण, प्रथमेश कापडे याने 5 सुवर्ण, वैष्णवी जगताप 5 सुवर्ण, कांचनमाला पांडे याने 4 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेला अभिमन्यू गायकवाड, हेमलता पावसे, विस्तारक दिनेश अग्रवाल, भाजपा पूर्व अध्यक्ष संदीप सिंग, ठाणे जिल्हा पॅरा संघटनेचे सचिव अर्चना जोशी, भाजपा कार्यकर्ते संतोष पाटील, अरूण दिघे, संदीप तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.