शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

९ वीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार, भाईंदरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:17 IST

९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे.

मीरारोड - ९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ठाणे न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मुलीचा सतत पाठलाग करत असे. एकतर्फी प्रेमातुन हा प्रकार घडल्याचे सांगीतले जाते.भार्इंदर पश्चिमेस राहणारी सदर पिडीत मुलगी ही भाईंदर पुर्वेच्या शाळेत शिकते. बुधवारी सकाळी तीची आई तीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. पावणे सात च्या सुमारास भार्इंदर सबवे मध्ये दोघी जात असताना अचानक विनोदकुमार कश्यप (२५ ) रा. जय अंबेनगरयाने मागुन जाऊन दोघींना गाठले. आईला धक्का देत त्याने चाकूने मुलीवर वार करत पळ काढळा. या घटनेने मुलीच्या आईला देखील धक्का बसला. त्याच वेळी तेथुन जाणारया उमाशंकर यादव या रिक्षा चालकाने दोघींना पाहिले व त्वरीत नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले. पण तेथे उपचार न मिळाल्याने मुलीला कांदिवलीच्या शताव्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुलीवर चाकूने ५ ते ६ वार झाले आहेत. गाल, छाती, हात व पायावर वा झाले असुन तीची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगीतले.आरोपी विनोदकुमार हा मुळचा उत्तरप्रदेशचा असुन तो भार्इंदर पुर्वेच्या एका स्टील कारखान्यात नोकरीला आहे. जयअंबे नगर मध्ये तो आपल्या नातलगा कडे राहतो. गेल्या दिड - दोन वर्षां पासुन तो पिडीत मुलीचा पाठलाग करायचा, तीची छेड काढायचा. नेहमीच्या जाचाला कंटाळलेल्या त्या मुलीने अखेर घडत असलेला सर्व प्रकार पंधरा दिवसां पुर्वी आपल्या घरी सांगीतला. त्यानंतर तीच्या पालकांनी विनोदला समज दिली होती.पण याच गोष्टीचा राग येऊन विनोदने बुधवारी सकाळी भार्इंदर येथील मासळी बाजारातुन चाकू खरेदी केला. व सबवे मध्ये आई व मुलीला एकटे गाठुन चाकूने वार करत पलायन केले.आरोपी विनोद कुमार हा पळुन गेला होता. घटना समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाजुका पाटील सह कदम, भोई आदिंनी त्याचा शोध सुरु केला.पळालेल्या आरोपीस तो काम करत असलेल्या स्टील कारखाना मालकाने बोरीवली पोलीस ठाण्यात हजर केले. तेथुन पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असे सुत्रांनी सांगीतले.तर या घटनेने खळबळ उडाली असुन पालिकेच्या सबवे मधील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. 

टॅग्स :Crimeगुन्हाMira Bhayanderमीरा-भाईंदर