शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डयांचे साम्राज्य; 7 कोटींची दुरुस्ती खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 15:09 IST

शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे.

ठळक मुद्देया उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली.

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते वंजारपट्टीनाक्यावरील स्व. राजीव गांधी उड्डाणंपुलावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखों रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्यात या उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने या उड्डाणपुलावरच आता मोठी वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपुलावर पडलेले खड्डे आणि होणारी वाहतूक कोंडीमुळे खड्ड्याने आतापर्यतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्याच गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांमध्ये मनपा प्रसंगासनाच्या दुर्लक्षित कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील पाच महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले असून अजूनही दिखाव्यासाठी हे दुरुस्ती काम सुरूच आहे. मात्र, अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून, या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाण पूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. 

या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून आता या उड्डाणपुलावार मोठ मोठे खोल खड्डे पडल्याने या उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर, खड्ड्यात आपटून वाहने देखील नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार व मनपातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून लवकरात लवकर या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांसह चालकांनाकडून केली जात आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातBhiwandiभिवंडी