शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राजा, प्रजेच्या खानपान सेवेत तफावत; नगरसेवक-अधिकाऱ्यांसाठी १५० रुपयांची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:40 AM

कोरोनाग्रस्तांना दोनवेळचे जेवण, नाश्ता, चहासाठी फक्त १५१ रुपये

- धीरज परब मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी महासभा, समित्या यांच्या बैठकांना हजेरी लावतात, तेव्हा एकवेळच्या जेवणाच्या थाळीचा दर १५० रुपये असतो. मात्र, महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना दिले जाणारे दोन्ही वेळचे जेवण, नाश्ता, चहा-बिस्कीट यावर मिळून महापालिका १५१ रुपये खर्च करीत आहे. यावरून, लोकप्रतिनिधी आपल्या पोटाचा प्रश्न येतो, तेव्हा करदात्या जनतेच्या पैशांतून ऐश करतात. परंतु, नागरिकांना जेव्हा सुविधा द्यायची वेळ येते, तेव्हा हात आखडता घेतात, हेच सिद्ध झाले आहे. 

अनागोंदी, दुर्लक्ष व पैसे देण्यास टाळाटाळ आदी कारणांनी कोविड रुग्णालये, कोविड केअर व अलगीकरण कक्षांतील शेकडो कोरोनाग्रस्त नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू असल्याचे भयाण वास्तव निदर्शनास आले आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदरच्या पं. भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे. तेथील रुग्णांना आ. गीता जैन यांच्या माध्यमातून विनामूल्य जेवण, नाश्ता आदी पुरवले जायचे. हे जेवण, नाश्ता डॉक्टर व आहारतज्ज्ञांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे बनवून दिले जायचे. त्यासाठी जवळच्याच हॉटेलच्या भागीदारांनी स्वत:चे किचन, कर्मचारी उपलब्ध केले.

सामाजिक भावनेने हे कार्य सुरू असताना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने स्वखर्चातून ही सुविधा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेलच्या चालकांना पैसे अदा करून जेवण पुरवा, असे सांगण्यात आले. जूनपासून दर ठरवून रुग्णांना जेवण पुरवण्याचे काम केले जात असताना पालिकेकडून मात्र बिलाची रक्कम अदा करण्यात चालढकल सुरू झाली. मोफत किती पुरवणार म्हणून शेवटी एक दिवस रुग्णांना सकाळचा नाश्ता देणे अशक्य झाले. परंतु, नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नाही.भार्इंदर येथेच पालिकेने सुरू केलेल्या अलगीकरण कक्षातील नागरिकांना सुरुवातीच्या महिनाभर ‘फाइट फॉर राइट’चे राजू विश्वकर्मा आणि सहकाºयांनी मोफत जेवण, नाश्ता पुरवला.

परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे संस्थेने असमर्थता दर्शवल्यावर पालिकेने संस्थेच्या पदाधिकाºयांना बोलावून काम बंद करू नका, पालिका पैसे देईल, असे सांगितले. त्यानुसार, १५ मेनंतर ‘जीवन ज्योत’ संस्थेमार्फत अलगीकरण केंद्र व नंतर कोविड केअर केंद्र येथील रुग्ण व क्वारंटाइन लोकांना जेवण दिले जाऊ लागले. यासाठी दरमाणसी १५१ रुपये संस्थेला दिले जातात. तेही पंधरापंधरा दिवस मिळत नाहीत. या रकमेत दोनवेळचे जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, सायंकाळी चहा बिस्किटे दिली जातात. एखाद्या रुग्णाने दूध मागितल्यास ते दिले जाते.

जेवण बनवण्यासाठी पालिकेने अलगीकरण कक्षाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर जागा दिली आहे. जेवण वितरणाची जबाबदारी स्वच्छतेसाठी नियुक्त ठेक्याचे कामगार करतात. अलगीकरण व कोविड केअरमध्ये जेवणाच्या तक्रारी जुलै महिन्यापासून अधिक आल्या. जेवण-नाश्ता वेळेवर मिळत नाही. अन्नाला चव नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.

ताळमेळ नसल्याने गैरसोय

रोज किती रुग्ण व क्वारंटाइन लोक दाखल होणार व किती घरी जाणार, याचा ताळमेळ नसल्याने अचानक २००-३०० माणसे वाढली की, त्यांना जेवण बनवून देण्यास वेळ लागतो. पालिकेच्या अधिकाºयांनी लक्ष ठेवणे, जेवण-नाश्त्याची चव पाहणे आणि वितरणावर लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवक-अधिकाºयांना महासभा, समित्यांच्या बैठकांवेळी एकवेळच्या थाळीकरिता महापालिका १५० रुपये खर्च करते. कोरोनाग्रस्त नागरिकांचे दोनवेळचे जेवण, नाश्ता, दोनवेळचा चहा, बिस्किटे यावर अवघे १५१ रुपये खर्च केले जात आहेत. राजा व प्रजा यांच्या खानपान सेवेतील ही तफावत हेच बेचव जेवणाचे मुख्य कारण आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर