मेहुणीचेच केले अपहरण, तब्बल दोन वर्षांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 03:41 AM2018-09-18T03:41:27+5:302018-09-18T06:42:58+5:30

सासू-सासऱ्यांसह पत्नीस धक्का; अपहरण करून ठेवले वेगवेगळ्या ठिकाणी

The kidnapping of sister-in-law, kidnapping, was done after two years | मेहुणीचेच केले अपहरण, तब्बल दोन वर्षांनी केली सुटका

मेहुणीचेच केले अपहरण, तब्बल दोन वर्षांनी केली सुटका

Next

ठाणे : आपल्याच मेहुणीचे दोन वर्षांपासून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया करण हिरे (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या तावडीतून पीडित मुलीचीही सुटका केली आहे.

करण हिरे (नावात बदल) हा पत्नीसह मुंबईतील मालाड भागात वास्तव्याला होता. दोन वर्षांपूर्वी पत्नी बाळंतपणासाठी माहेरी (डोंबिवली, जि. ठाणे) येथे गेल्यानंतर त्याने पत्नीच्याच १७ वर्षीय बहिणीला लग्नाचे अमिष दाखवून तिचे अपहरण केले. आपल्याच पतीने बहिणीचे अपहरण केल्याचे त्याच्या पत्नीला माहित नव्हते. पती पत्नींमधील भांडणामुळे तो पत्नीच्या संपर्कात नसल्यामुळे त्याच्यावर केवळ संशय होता. त्याने मेव्हणीचे अपहरण केल्यानंतर तिला नाशिक, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो ठेवत होता. त्यामुळे त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मुलीच्या अपहरण प्रकरणी ५ जून २०१६ रोजी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

कालांतराने हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. पीडित अपह्रत मुलगी, तिची एक वर्षांची मुलगी आणि अपहरणकर्त्यासह ठाण्याच्या कोर्टनाका येथील टीएमटी बस थांब्याजवळ आल्याची टीप उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली १३ सप्टेंबर रोजी मिळाली. त्या आधारे उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक पाटील, पोलीस नाईक निशा कारंडे, शिपाई वर्षा माने आदींनी सापळा रचून हिरे याला ताब्यात घेतले. दोघांनाही डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांसमोर पेच; मेहुणीला आरोपीपासून एक मुलगी
अपह्रत मुलगी आरोपीची मेव्हणी ही दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन होती. दरम्यान, त्याच्यामुळे तिला एक मुलगीही झाली. आता पीडित मुलगी सज्ञान झाल्यामुळे मला आता त्याच्याबरोबरच राहायचे असल्याचा हट्ट तिने पोलिसांकडे धरला.
तिच्या या हट्टामुळे पोलिसांसमोर अनोखा पेच निर्माण झाला होता. दोन वर्षांनंतर मुलगी आपल्याच जावयाबरोबर मिळाल्याने त्याच्या सासू सासºयांसह त्याच्या पत्नीलाही धक्का बसला.
मेव्हणीचे अपहरण केल्यानंतर तिला नाशिक, मुंबई, पुणे अशा ठिकाणी तो ठेवत होता. त्यामुळे त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मुलीच्या अपहरण प्रकरणी ५ जून २०१६ रोजी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: The kidnapping of sister-in-law, kidnapping, was done after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.