उल्हासनगरात ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण
By सदानंद नाईक | Updated: July 5, 2024 19:34 IST2024-07-05T19:34:14+5:302024-07-05T19:34:53+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरात ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, सिद्धार्थनगर वॉटर सफ्लाय येथील सोनाली पाटील यांचा ९ वर्षाचा मयूर मंगळवारी दुपारी साडे चार वाजता दुकानात जातो म्हणून घराबाहेर पडला होता. तेंव्हापासून घरी न परतल्याने, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर सार्वजनिक हॉल सिद्धार्थनगर येथे सोनाली सोनू पाटील यांचा ९ वर्षाचा मुलगा मयूर दुकानात जातो म्हणून मंगळवारी दुपारी साडे चार वाजता घरातून बाहेर पडला. मात्र दुकानात गेलेला मयूर सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने, आईसह अन्य नातेवाईकांनी परिसरात त्याचा शोध घेतला असता, मिळून आला नाही. अखेर आई सोनाली पाटील हिने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरविल्याची माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात इसमावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलाचा शोध सुरू केला आहे.