अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 23:32 IST2020-09-30T23:31:42+5:302020-09-30T23:32:02+5:30
महापालिकेने ही इमारत अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले होते. या इमारतीत कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काही दुकानदारांचे गाळे होते.

अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीची कारवाई
कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौकातील आंबेडकर रोडवरील कृष्णा सिनेमाच्या आवारात असलेल्या तळ अधिक तीन मजली अतिधोकादायक इमारतीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने बुधवारी कारवाई केली.
महापालिकेने ही इमारत अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले होते. या इमारतीत कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काही दुकानदारांचे गाळे होते. हे गाळे रिकामे करण्याची नोटीस महापालिकेने यापूर्वीच बजावली होती. या इमारतीचा काही भाग पडल्याची तक्रार महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे करण्यात आली होती. ही तक्रार प्राप्त होताच ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या कारवाई पथकाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. एक पोकलेन, एक जेसीबीद्वारे इमारत जमीनदोस्त करण्यात येत आहे. दरम्यान, कारवाईपूर्वी सर्व गाळे रिकामे करण्यात आले होते.