शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

कल्याणच्या डॉक्टर दाम्पत्यामुळे वाचले परदेशी महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:34 IST

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ विमानतळावरून रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले.

कल्याण : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ विमानतळावरून रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. काही वेळातच एका ६३ वर्षीय ऑस्ट्रेलियन प्रवासी महिलेला अस्वस्थ वाटत असून तिला वैद्यकीय उपचारांची गरज असल्याची उद्घोषणा करण्यात आली. याच विमानाने कल्याणचे डॉ. नितीन झबक आणि डॉ. नीता झबक हे दाम्पत्य भारताकडे परतीचा प्रवास करत होते. त्यांनी त्या महिलेकडे धाव घेऊन तिच्यावर तातडीने उपचार करून तिचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले.डॉ. नितीन झबक हे सर्जन आहेत, तर डॉ. नीता या बालरोगतज्ज्ञ आहेत. ते आॅस्ट्रेलियाला १२ दिवसांसाठी फिरायला गेले होते. ते या विमानातून परतीचा प्रवास करत होते. विमानात एकूण १६३ प्रवासी होते. प्रवासादरम्यान महिलेची प्रकृती अचानक बिघडून ती बेशुद्ध पडली. तिला उपचारांची आवश्यकता असून कुणी डॉक्टर असल्यास पुढे येण्याची उद्घोषणा करण्यात आली. त्यानंतर, डॉ. झबक दाम्पत्याने आपले ओळखपत्र दाखवून ओळख सांगितली. त्यानंतर, विमानातील कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती साधने त्यांना पुरवली. आजारी महिलेला तपासले तेव्हा तिची पूर्णपणे शुद्ध हरपली होती. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब तपासल्यानंतर तिला आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. तसेच सलाइनही लावण्यात आले. बेशुद्ध पडलेल्या महिलेसोबत आणखी एक महिला होती. ती आणि विमान कर्मचाºयांनी उपचारांदरम्यान मदत केली. त्यानंतर, विमान सिंगापूर विमानतळावर उतरवण्यात आले. त्यांना फुकेतला जायचे होते. या विमानतळावर उतरल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, संबंधित रुग्णालयाकडून या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा संदेश मोबाइलवर शनिवारी आल्याचे डॉ. झबक यांनी सांगितले. विमानप्रवासादरम्यान त्या आॅस्ट्रेलियन महिलेला वेळेत उपचार मिळाले नसते, तर तिच्या जीवावर बेतू शकले असते, असे त्यांनी म्हटले आहे.>जीव वाचवल्याचे समाधानउपचारानंतर विमानातील कर्मचाºयांनी डॉक्टर दाम्पत्याला मिठी मारून त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना भेटवस्तूसह प्रत्येकी २०० डॉलरचे गिफ्ट व्हाउचर दिले आहे. झबक दाम्पत्य शनिवारी कल्याणला पोहोचले. रुग्णाचे प्राण वाचवल्याचे समाधान डॉक्टरसाठी मोठे असते, अशी भावना डॉ. नितीन व नीता झबक यांनी व्यक्त केली.