कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ
By नितीन पंडित | Updated: May 29, 2023 17:15 IST2023-05-29T17:15:18+5:302023-05-29T17:15:44+5:30
यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ
भिवंडी: कल्याण ते भिवंडी धामणकर नाका या नव्या बससेवेचा शुभारंभ सोमवारी धामणकर नाका येथे भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या हस्ते नारळ वाढवून व या बसचे चालक वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन व सन्मान करून करण्यात आला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेच्या वतीने कल्याण येथून दर अर्धा तासाने धामणकर नाका येथ पर्यंत असणार असून या बससेवेचा फायदा भिवंडी शहरातील कल्याण मार्गे ठाणे,मुंबई,नवी मुंबई परिसरात जाणारे विद्यार्थी,चाकरमान्यां सह व्यवसायिक व्यापारी वर्गाला या बससेवेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या वेळी माजी गटनेता हनुमान चौधरी,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रेषित जयवंत,सुगंधा टावरे,रेखा पाटील, महिला शहराध्यक्षा ममता परमाणी,युवा मोर्चा शहराध्यक्ष परेश चौगुले,दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष मोहन कोंडा,शहर जिल्हा उपाध्यक्ष सत्वशीला जाधव,सीमा महेश्वरी,संतोष पालकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.