Kalayan Crime: बदलापूर येथील चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर चर्चा थांबत नाही, तोच कल्याणमध्ये एका साधूच्या वेशातील भोंदूने मुलीवल अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. अघोरी विद्येच्या मदतीने समस्या सोडवण्याच्या नावाखाली या भोंदू बाबाने मुलीसोबत खोलीत नेऊन नको ते कृत्य केले.
मुलीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
कल्याणजवळील आंबिवली परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. अघोरी विद्या येत असल्याचा दावा करत एका भोंदू बाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केले. या भोंदूचे नाव अरविंद जाधव असून, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने सांगितली आपबीती
"मी एका बाबाकडे माझी कौटुंबिक समस्या घेऊन गेले होते. पण, त्या बाबाने माझ्याशी घाणेरडे कृत्य केले. मी माझ्या नातेवाईकाला घेऊन बाबाकडे गेले. त्या बाबाने नातेवाईकाला बाहेर बसायला सांगितले आणि मला एकटीला खोलीत घेऊन गेला", असे पीडितेने सांगितले.
"तू खूप अडचणीमध्ये आहे. मी तुझी समस्या सोडवतो, असे म्हणत तो बाबा माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श करू लागला. त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टलाही हात लावला", अशी आपबीती पीडितेने सांगितली. दरम्यान, पीडित मुलीने नातेवाईकासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.