शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कल्याण लोकसभा: भाजपा, शिवसेनेचा बुथरचनेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:32 AM

दोन्ही पक्ष ११ लाख मतदारांशी साधणार संपर्क, ६१८ बुथ सज्ज

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जोमाने तयारी सुरू केली आहे. कल्याण मतदारसंघातील डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी भाजपाचे ४०७ बुथ सज्ज झाले आहेत. त्यात डोंबिवली पूर्व मंडल आणि कल्याण ग्रामीणमधील २१९, तर डोंबिवली पश्चिम मंडलातील पक्षाचे १८८ बुथ आहेत. शिवसेनेचेही दोन्ही मतदारसंघ मिळून ६१८ बुथची रचना पूर्ण झाली आहे. या रचनेतून दोन्ही पक्ष सुमारे ११ लाख मतदारांशी संपर्क साधणार आहेत.भाजपाची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, युतीची एकत्रित बैठक, त्यात मिळणाऱ्या सूचनांनुसार कार्यकर्ते कामाला लागतील, असे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, साधारणपणे ‘एक बुथ २५ युथ’, अशी रचना आहे. प्रत्येक बुथवर बुथप्रमुख नेमला आहे. त्याच्यासोबत कामासाठी प्रत्येकी २५ कार्यकर्ते, पदाधिकारी असा चमू तयार केला आहे. एका बुथच्या टीमला सरासरी ११०० मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही बुथरचना केली आहे. पण, युतीची अजून एकत्रित बैठक न झाल्याने नेमके काम कसे करायचे आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे ते पुढे म्हणाले.बुथच्या माध्यमातून चार लाख ४७ हजार ७०० मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघांमधील मतदारांचा त्यात समावेश आहे. कार्यकर्त्यांना याद्यांचे वाटपदेखील झाले आहे. कोणकोणत्या मतदारांशी कोणी संपर्क करायचा, याचेदेखील नियोजन झाल्याचे बीडवाडकर यांनी सांगितले.सेनेचे ‘एक बुथ २० युथ’शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, पक्षाच्या धोरणांनुसार ‘एक बुथ २० युथ’, अशी संकल्पना राबवण्यात येत आहे.कार्यकर्ते निवडणूक कामासाठी तयार झाले आहेत. त्या माध्यमातून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ३०३ बुथ, तर कल्याण ग्रामीणमध्येही ३१५ बुथ तयार केले आहेत.त्या पक्षाच्या माध्यमातूनही एका यादीत सुमारे १२०० मतदार असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा