Kalyan: स्वत:चे घर कसे भरेल हेच काही लोकप्रतिनिधींचे काम, भाजप आमदारांचे नाव न घेता शिवसेना शहर प्रमुखाची टीका
By मुरलीधर भवार | Updated: June 19, 2023 16:14 IST2023-06-19T16:13:58+5:302023-06-19T16:14:23+5:30
Kalyan: काही लोक प्रतिनिधी असे आहेत. जे स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असताे. मग ब’नर काढण्याचा विषय असू की शाळा, प्रा’पर्टी बळविण्याच्या विषय असू द्या. कल्याणमधील जतना सूज्ञ आणि समजदार आहे.

Kalyan: स्वत:चे घर कसे भरेल हेच काही लोकप्रतिनिधींचे काम, भाजप आमदारांचे नाव न घेता शिवसेना शहर प्रमुखाची टीका
- मुरलीधर भवार
कल्याण - काही लोक प्रतिनिधी असे आहेत. जे स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असताे. मग ब’नर काढण्याचा विषय असू की शाळा, प्रा’पर्टी बळविण्याच्या विषय असू द्या. कल्याणमधील जतना सूज्ञ आणि समजदार आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. त्या लोकांच्या समस्या अडचणी सोडविण्याची गरज आहे अशी टिका कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे नाव न घेता केली आहे. या टिकेमुळे कल्याण पूर्व भागातील शिवसेना भाजपमधील वाद संपत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
भाजप आमदार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी लावण्यात आलेले ब’नर महापालिकेच्या अधिकाऱ््याने काढण्याची कारवाई केली. आमदारांनी अधिकाऱ््याला रस्त्यात गाठून पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. कारवाई केवळ माझ्या ब’नरविरोधात करण्याएवजी जे शहरात बेकायदा ब’नर लागले आहे. त्याच्या विरोधात मी तक्रारी केल्या आहेत. त्या विरोधात कारवाई का केली जात नाही, असा जाब विचारला. आमदार गायकवाड यांनी हे देखील सांगितले की, अधिकाऱ््यास ब’नरच्या विराेधात कारवाई करण्यास सांगणारी राजकीय अदृश्य शक्ती आहे. यावेळी आमदार गायकवाड यांनी शिवसेनेच्या नेत्याचा नामोल्लेख न करता अदृश्य शक्तीचा उल्लेख केला होता. त्याला प्रतिउत्तर देणारी टिका शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे.
या आधी भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्याला शिवसेना सहकार्य करीत नसल्याचे भाजपने म्हटले हाेते. कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला. या वादावर पडदा टाकण्यात आला. वाद मिटल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लोकग्रमा पादचारी पूलाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात भाजप आमदार गायकवाड हे उपस्थित होते. शिवसेना भाजप मध्ये मनोमिलन झाल्याचे या कार्यक्रमात दिसून आले. शिवसेनेने पुन्हा आमदार गायकवाड यांना टिकेचे लक्ष्य करीत गंभीर आरोप केल्याने वाद काही संपेना असेच यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे.