शिवसेनेला मोठा धक्का ! कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 19:55 IST2017-11-30T18:42:17+5:302017-11-30T19:55:57+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.

शिवसेनेला मोठा धक्का ! कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कल्याण न्यायालयानं दिला आहे.
निवडणूक अर्जासह राजेंद्र देवळेकरांनी दोन वेगवेगळी जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवकपद रद्दबातल ठरवण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळेकरांसह शिवसेनेलाही कल्याण-डोंबिवलीत मोठा झटका बसला आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राजेंद्र देवळेकरांना एक महिन्याची मुदत सुद्धा न्यायालयानं दिली आहे.
या निकालानंतर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, माननीय कल्याण न्यायालयानं माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला. परंतु त्याच न्यायालयानं या निर्णयास अपील पिरियडपर्यंत म्हणजेच उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे.