शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास तर रहिवाशांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 01:04 IST

कल्याण-डोंबिवली शहरांत तीन ठिकाणी घरफोड्या, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत काही महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. बंद असलेली घरे हेरून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करण्याचा सपाटा काही महिन्यांपासून सुरूच ठेवला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत तीन ठिकाणी घरफोड्या, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पूर्वेतील राजाजी पथ परिसरात असलेल्या आशीर्वाद इमारतीमध्ये राहणारे हिमांशू भोसले यांची आई बुधवारी रात्री घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी वाई येथे गेल्या होत्या. तर, हिमांशू नातेवाइकांकडे राहायला गेला होता. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. शुक्रवारी घरी परतल्यानंतर हिमांशू यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घरफोडीची दुसरी घटना मंगळवारी भरदिवसा घडली. पूर्वेतील स्टार कॉलनी येथील साईसृष्टी इमारतीत राहणारे दीपक भरीवार (४४) हे मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी भरीवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तिसरी घटना कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता मंदिर परिसरात घडली. गंगोत्री अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रतीक प्रधान (२८) हे आईवडिलांसह वाडेघर येथे राहणाऱ्या चुलत भावाकडे बुधवारी सायंकाळी राहायला गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा एक लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेत दोन ठिकाणी चोरीमहालक्ष्मी कृपा इमारतीमध्ये राहणारे पराग थोरात (३५) यांच्या घराच्या उघड्या खिडकीवाटे प्रवेश करत चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी ६ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोठागाव परिसरात असलेल्या काप्रोबा दर्शन चाळीत राहणाºया कांचन देवकुळे (४९) यांच्या घरातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी १० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी देवकुळे यांनी विक्रांत लाड याच्याविरोधात संशय व्यक्त करत विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीtheftचोरी