कल्याण-डोंबिवलीकरांची १०१०, ११०, ९१९१, २७ क्रमांकाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:06+5:302021-06-29T04:27:06+5:30

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : वाहनांसाठी फॅन्सी नंबर घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत ...

Kalyan-Dombivalikars prefer 1010, 110, 9191, 27 | कल्याण-डोंबिवलीकरांची १०१०, ११०, ९१९१, २७ क्रमांकाला पसंती

कल्याण-डोंबिवलीकरांची १०१०, ११०, ९१९१, २७ क्रमांकाला पसंती

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : वाहनांसाठी फॅन्सी नंबर घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. कल्याण आरटीओ क्षेत्रातील वाहनांचे मालकही त्याला अपवाद नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षांत ५३ वाहनांच्या मालकांनी त्यांच्या वाहनांना पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी आरटीओ नियमाची पूर्तता करून रीतसर फी भरून आवडता किंवा शुभ मानला जाणारा नंबरप्लेटचा क्रमांक पदरी पाडून घेतला.

कल्याण आरटीओ हद्दीत मोटारीसाठी पसंतीचा क्रमांक मिळविणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. २०२०-२१ मध्ये ३३ मोटारींच्या पसंतीच्या क्रमांकासाठी लागलेल्या बोलीतून दोन लाख ७२ हजर ६०१ रुपये आरोटीओच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यापाठोपाठ दुचाकींसाठी फॅन्सी नंबर घेण्याकडे कल आहे. २० दुचाकींच्या पसंती क्रमांकमधून ३६ हजार ४५२ रुपये मिळाले असून, एकूण वर्षभरात तीन लाख आठ हजार ५३ रुपयांचा महसूल मिळाल्याचे आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

----------------------

या चार नंबर्सना सर्वाधिक मागणी

१०१० - ६५ हजार रुपये

९१९१ - २५ हजार रुपये

११० - २१ हजार रुपये

२७ - २० हजार रुपये

----------------------

या नंबरचा रेट सर्वांत जास्त

मार्च २१ पर्यंत १०१० क्रमांक मिळवण्यासाठी कल्याण आरटीओमध्ये ६५ हजारांची ऑनलाइन बोली लागली असून, ती सर्वाधिक रुपयांची बोली होती.

--------------

आरटीओची कमाई

२०१८- १९ - माहिती मिळाली नाही

२०१९ -२० - माहिती मिळाली नाही

२०२०-२१ - ३,०८,०५४ रुपये

--------------------

कोरोना काळातही हौसेला मोल नाही

कोरोना काळात वाहनांची खरेदी कमी प्रमाणात का होईना सुरूच असून, त्यातही फॅन्सी नंबरप्लेटला मागणी असल्याचे दिसून आले आहे. या वर्षभरात कल्याण आरटीओमध्ये वरील पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी ५३ वाहनचालकांनी बोली लावली होती. त्यातून सुमारे लाखोंचा महसूल मिळाला आहे.

----------------

...तर नंबरसाठी होतो लिलाव

एकाच क्रमांकाची मागणी असेल तरच लिलाव होतो, परंतु तसे कल्याण आरटीओ क्षेत्रात झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

----------------

वाहन म्हटले की आवड आलीच. मग त्याचा रंग काय असावा, सीट, डिझेल-पेट्रोल की सीएनजी, असा सगळा अभ्यास, पसंती आलीच. नंबरप्लेटही त्यातून सुटली नाही. आरटीओ क्षेत्रातही चोखंदळ, पसंतीला प्राधान्य देणारे ग्राहक आहेत. ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी लिलाव होतो आणि मग ज्याची बोली जास्त, त्यांना तो क्रमांक दिला जातो. यंदा काम बंद असल्याने अजून तरी नवीन सिरीज सुरू झालेली नाही; पण असे क्वचित घडते. आरटीओ कार्यालयातील सगळे कामकाज लवकरच सुरळीत सुरू होईल.

- तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी, कल्याण

------------

Web Title: Kalyan-Dombivalikars prefer 1010, 110, 9191, 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.