शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचा फैलाव; पाच महिन्यांत २६० संशयित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:14 AM

नगरसेवकालाही लागण

अनिकेत घमंडी डोंबिवली : नोव्हेंबरला सुरुवात झाली तरीही अधून-मधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण तसेच मधेच वाढणारी उष्णता, अशा खराब हवामानामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. केडीएमसी हद्दीत जून ते आॅक्टोबरदरम्यान डेंग्यूचे २६० संशयित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ऑक्टोबरमध्ये यंदा पाऊस आणि ऊन, असे दमट वातावरण होते. त्यातही आठवडाभरापासून दुपारी वातावरणात अचानक उष्मा तर, सकाळी आणि रात्रीच्या वेळेस काहीसा गारवा जाणवत आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढल्यामुळे टिटवाळा, आंबिवली, शहाड, कल्याण, डोंबिवली परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. सर्वच संशयित रुग्णांना दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची गरज नसली तरी आजार वाढू नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही जनजागृती केली जात आहे.

अस्वच्छता, साचलेले पाणी अशा ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने स्वच्छता विभागाकडून स्वच्छता केली जात असल्याचा दावा करण्यात आला. डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढल्याने या आजारावर कसे नियंत्रण मिळवायचे, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. रुग्ण वाढू नयेत, यासाठी आरोग्य अधिकारी आपल्या पथकासह ठिकठिकाणी पाहणी, जनजागृती करत असल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच ते राहत असलेल्या पेंडसेनगरमधील मैत्री इंदिरासदन सोसायटीत तिघांना डेंग्यू झाला आहे. खासगी डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दामले हे सध्या घरीच उपचार घेत आहेत. दामले यांना डेंग्यू झाल्याचे कळताच महापालिकेने त्या परिसरात अन्य रुग्ण आहेत का, याचे सर्वेक्षण केले आहे.खराब हवामानामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नये. तसेच पाणी साठवून ठेवू नका. स्वच्छता राखा. डासांचा प्रार्दुभाव होत असेल तर तातडीने महापालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधावा. धूर फवारणी करून घ्या. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. महापालिकेलाही त्याची माहिती द्या, जेणेकरून खबरदारीच्या उपाययोजना करता येतील. - डॉ. राजू लवंगारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसीडेंग्यू संशयित रुग्ण आढळत असलेल्या परिसरात डासआळी नाशक पावडर तसेच धूरफवारणी आजुबाजूच्या परिसरात तातडीने केली जात आहे. आमचे पथक तेथे स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत होत आहे. धूरफवारणी विविध ठिकाणी सुरूच आहे. पण एखादा रुग्ण आढळल्यास त्याला लागण होण्यामागील कारण काय, हे देखिल पाहणे तेवढेच आवश्यक असते. त्यानुसार आमचे काम सुरू असते.- विलास जोशी, साहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :dengueडेंग्यूkdmcकल्याण डोंबिवली महापालिका