कल्याण डोंबिवली गुन्हे सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST2021-02-21T05:16:16+5:302021-02-21T05:16:16+5:30

कल्याण : बिर्ला कॉलेज परिसरात राहणारे जितेंद्र दाठिया यांनी त्यांची दुचाकी कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकच्या खाली उभी करून ...

Kalyan Dombivali Crime Summary | कल्याण डोंबिवली गुन्हे सारांश

कल्याण डोंबिवली गुन्हे सारांश

कल्याण : बिर्ला कॉलेज परिसरात राहणारे जितेंद्र दाठिया यांनी त्यांची दुचाकी कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकच्या खाली उभी करून ठेवली होती. चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

दुचाकीची बॅटरी लंपास

कल्याण : नांदिवली परिसरात राहणारे लाल बहादूर पाल यांनी त्यांची दुचाकी पार्क केली असता त्यांच्या दुचाकीची बॅटरीची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

दुचाकीची चोरी

कल्याण : कुर्ला येथे राहणारे सतीश शहा यांनी त्यांची दुचाकी गणपती मंदिर बोगद्याजवळ पार्क करुन ठेवली असता चोरट्यांनी दुचाकी चोरली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------

रक्कम लंपास

कल्याण : खडकपाडा येथे राहणारे प्रमोद जैन यांचे चक्कीनाका येथे टाईल्सचे दुकान आहे. या दुकानातून चोरट्यांनी ७० हजारांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

दागिन्यांची चोरी

कल्याण : शहरातील पूर्व भागात कालिका मंदिर परिसरात राहणाऱ्या अनिता गवई यांच्या बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी १० हजारांचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

Web Title: Kalyan Dombivali Crime Summary