शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 11:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या.

कल्याण - मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना-भाजपा एकमेकांपासून दुरावले आहेत. तर भाजपा-मनसेची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होऊ शकते असं भाकीत कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं आहे. 

याबाबत बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, एकमेकांना शिव्या देऊन जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर आम्ही हिंदुत्ववादी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असा टोला गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला ५३, भाजपला ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे नगरसेवक निवडून आले. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. मात्र राज्यातील सत्तास्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय गणित बदललं आहे. 

दरम्यान, मुंबईत झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने भाजपाकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं, सीएए समर्थनासाठी राज ठाकरेंकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची बदलेली भूमिका भाजपाच्या फायद्याची ठरत असल्याने भविष्यात मनसे-भाजपा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझोता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली होती. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHindutvaहिंदुत्वRaj Thackerayराज ठाकरे