शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:22 IST

कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना अपघात, एकाचा मृत्यू 'रेल्वे रूळ ओलांडू नका' यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू असतानाच झाला अपघात

डोंबिवली - कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलची धडक बसल्याने तरुण अपघातात गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दरम्यान, कोपर स्थानकात मंगळवारपासून (5 फेब्रुवारी) भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, आरपीएफ आणि प्रवासी संघटनांचे 'रेल्वे रूळ ओलांडू नका' यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी सकाळीही हे अभियान सुरू असतानाच एका प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी, अशीही मागणी केली जात आहे.  

पदर अडकल्याने रेल्वेखाली चिरडून मायलेकासह तिघे ठार दरम्यान, रविवारीदेखील (3 फेब्रुवारी) रेल्वेखाली चिरडून कल्याण येथील कोळसेवाडीच्या मायलेकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना  दुपारी कोपर रेल्वेरुळावर घडली. कोळसेवाडी येथील 26 वर्षीय प्रीती उदय राणे, तिचा दोन वर्षांचा मुलगा लिवेश आणि कोपर येथील 62 वर्षीय सुनीता भंगाळे यांचा मृत्यू झाला. तर प्रीतीचे 65 वर्षीय सासरे भास्कर चंदू राणे हे जखमी झाले.

(रूळ ओलांडणाऱ्यांना चॉकलेट वाटप, भाजपा, रेल्वे पोलिसांनी राबवली जनजागृती मोहीम)

प्रीती तिचा मुलगा लिवेशला घेऊन सासरे भास्कर राणे यांच्यासोबत दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोपर येथील भंगाळे यांच्या घरी जात होती. त्यांच्या नातलग सुनीता भंगाळे यादेखील सोबत होत्या. त्या वेळी कोपर रेल्वेरूळ ओलांडताना एका रुळावरून जनशताब्दी एक्स्प्रेस तर दुसऱ्या रुळावरून जलद लोकल आली. दोन्हीकडून अचानक रेल्वे आल्याने सुनीता व प्रीती या दोन्ही रुळांच्या मध्ये थांबल्या. त्या वेळी रेल्वेमध्ये सुनीता यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्यांच्यासोबत प्रीती आणि लिवेश हे दोघेही रेल्वेखाली आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे