Kalyan: भाऊ बहिणीने केले शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2023 17:51 IST2023-08-29T17:51:35+5:302023-08-29T17:51:45+5:30

Kalyan: कल्याण पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ काढला आहे.

Kalyan: Brother and sister sexually assaulted a minor girl living next door, police handcuffed them | Kalyan: भाऊ बहिणीने केले शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan: भाऊ बहिणीने केले शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

- मुरलीधर भवार 
कल्याण - कल्याण पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ काढला आहे.  पीडित मुलीने ही बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.. कोळशेवाडी पोलीसांनी दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेडया ठोकल्या आहेत.

बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते.. याच परिसरात अजय थापा व सपना थापा दोघे भाऊ बहीण राहतात. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघाची नजर तिच्यावर पडली. अजयने या मुली सोबत अश्लील चाळे केले. अजयचे अश्लील चाळे सुरू असताना त्याची बहीण सपना हिने त्याचा व्हीडीआे तयार केला.  या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडीतेने तिच्यासोबत घडला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कोळशेवाडी पोलिसांनी अजय थापा आणि सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Kalyan: Brother and sister sexually assaulted a minor girl living next door, police handcuffed them

टॅग्स :kalyanकल्याण