कल्याण : दोन मुलींना सोडून बापाचे पलायन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:25 IST2018-02-27T03:25:27+5:302018-02-27T03:25:27+5:30

कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन चिमुकल्या मुलींना सोडून एक अज्ञात इसम निघून गेला आहे.

Kalyan: Baba's departure from two daughters? | कल्याण : दोन मुलींना सोडून बापाचे पलायन ?

कल्याण : दोन मुलींना सोडून बापाचे पलायन ?

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन चिमुकल्या मुलींना सोडून एक अज्ञात इसम निघून गेला आहे.
त्यापैकी एका मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे आहे. रात्री १ वाजेपर्यंत त्या रेल्वे स्थानकात फिरत होत्या. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांना रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता त्यांना सोडून गेल्याचे लक्षात आले. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागल्या.
रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले तेव्हा त्यांना सोडून जाणा-या इसमाचा फोटो पाहून त्या मुलींनी ‘पापा पापा’ अशा हाका मारल्या. त्यामुळे फोटोतील व्यक्ती त्या मुलींचे वडील असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून रेल्वे पोलीस त्या मुलींची काळजी घेत आहेत.

Web Title: Kalyan: Baba's departure from two daughters?

टॅग्स :kalyanकल्याण