शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:01 IST

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद

कल्याण: राज्यात लॉक डाऊन व संचार बंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला व अन्नधान्य येत असल्याने पणन खात्याच्या आदेशानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. बाजार समिती प्रशासनाने समिती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी होलसेल व्यापारी वर्गाकडून व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेत स्वत:च्या जोखमीवर व्यापार सुरु ठेवावा असे आवाहन केले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यापार बंद करु नये असे आवाहन समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी रिकामी करण्यात येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत वळविला आहे. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवाक नियमित आहे. त्यात घट झालेली नाही असे सचिव चौधरी यांनी सांगितले. बाजार समितीत जवळपास दररोज आठ हजार क्वींटल माल येत आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा नाही. बाजार समितीत शेतमाल व अन्नधान्य हे अत्यावश्यक असल्याने बाजार समिती बंद करु नये असे पणन खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीमधील फूल बाजार व जनावरांचा बाजार 20 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे. फूल बाजारात दिवसाला एक कोटी रुपयांची उलाढाल होते. तर जनावरांच्या बाजारात दिवसाला 25 लाख रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल शुक्रवारपासून बंद आहे. त्याचा फटका जनावरांच्या मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांना बसला आहे. बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद करण्यासंदर्भात समिती प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे पत्र दिलेले नाही. बाजार समितीत कोरोनामुळे मनुष्यबळ कमी आहे ही वस्तूस्थिती आहे. बाजार समितीचा सरकारी कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात कामावर हजर आहे.होलसेल मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, नवी मुंबई बाजार समिती बंद असल्याने त्याठिकाणचा माल याठिकाणी आला आहे. मात्र बाहेरच ग्राहक जास्त प्रमाणात दिसून येत आहे. कोरोनाच्या भितीपोटी बाहेरच्या ग्राहकाला रोखणे व्यापाऱ्यांना शक्य नाही. बाजारात त्यामुळे गर्दी वाढली आहे. होलसेल मालाला उठाव नाही. आवाक चांगली असली तरी उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला त्यांच्या जोखीमेवर त्यांनी व्यापार करावा. त्यांची काळजी घ्यावी. दुकानावर गर्दी झाल्यास ती टाळण्याकरीता दुकान बंद ठेवणे उचित होईल. बरेचसे माथाडी कामगार हे गावाला निघून गेले आहे. त्यामुळे शेतमाल टेम्पो व ट्रकमधून खाली कोण करणार असा प्रश्न आहे.दरम्यान बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, भाजीपाला व अन्नधान्य ही अत्यावश्यक बाब आहे. पणन खात्याच्या आदेशानुसार बाजार समिती सुरुच राहणार आहे. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटी ग्राहकांनी गर्दी न करता खरेदी विक्री करावी असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती