कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकास प्रत्येकी पाच लाख मंजूर, शासनाकडून दिली जाणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 02:03 PM2021-10-22T14:03:42+5:302021-10-22T14:04:06+5:30

Kalpita Pimple News: फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर  फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती.

Kalpita Pimple and her bodyguards will be given Rs 5 lakh each by the government | कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकास प्रत्येकी पाच लाख मंजूर, शासनाकडून दिली जाणार मदत

कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकास प्रत्येकी पाच लाख मंजूर, शासनाकडून दिली जाणार मदत

Next

ठाणे - फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर  फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. तसेच त्यांचा अंगरक्षक याच्याही बोटाला दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु आता या घटनेची राज्य शासनाने दखल घेऊन या दोघांनाही प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचा अध्यादेश काढण्यात आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना ही मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Kalpita Pimple and her bodyguards will be given Rs 5 lakh each by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :thaneठाणे