अवघ्या दीड तासात चोरट्यांनी लंपास केला अडीच लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST2021-05-13T04:41:21+5:302021-05-13T04:41:21+5:30

ठाणे : काही कामानिमित्त कुटुंबीय घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरट्यांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल २ ...

In just an hour and a half, the thieves stole Rs | अवघ्या दीड तासात चोरट्यांनी लंपास केला अडीच लाखांचा ऐवज

अवघ्या दीड तासात चोरट्यांनी लंपास केला अडीच लाखांचा ऐवज

ठाणे : काही कामानिमित्त कुटुंबीय घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरट्यांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल २ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाड्यातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भास्कर कॉलनीतील रहिवासी अतुल भागवत (५२) यांच्या घराचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे ते ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी आणि दोन मुलांसह घराला लॉक लावून अन्य एक घर पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याच दरम्यान त्यांची मुलगी ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतली. त्यावेळी घराचे लॅच पूर्णपणे लावलेले नसल्याचे आढळले. तेव्हा तिच्यासह कुटुंबीयांनी घरात पाहणी केली असता, घरातील सामानाची तसेच बेडरुम मधील कपाटात ठेवलेल्या लॉकर मधील एक लाख रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या आणि सोन्याचे एक मंगळसूत्र असे २ लाख ६० हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक एम. पी. सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In just an hour and a half, the thieves stole Rs