शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या बंडाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:05 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालय प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाणे शहरातील न्यायालयीन वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालय प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाणे शहरातील न्यायालयीन वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शहरातील काही नामांकित वकिलांनी न्याय विकत घ्यावा लागतो, अशी थेट टोकाची भाषा केली, तर काही विधिज्ञांनी न्यायव्यवस्थेमधील समस्यांना मीडियातून वाचा फोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निर्णयावर टीका केली.न्यायव्यवस्थेच्या कारभारात सुधारणा व्हावी, यासाठी दस्तुरखुद्द न्यायमूर्तींवर पत्रकार परिषद घेण्याची वेळ का आली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज कायदेतज्ज्ञांनी व्यक्त करतानाच भारतीय न्यायव्यवस्थेला सुवर्णेतिहास असतानाही अलीकडच्या काळात न्यायदानाची प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सोयीची राहिली नाही. ‘बळी तो कान पिळी’, या म्हणीप्रमाणे कायदाही धनाढ्यांच्या दावणीला बांधला गेला असल्याची खंत वकिलांनीच व्यक्त केली. दारूच्या नशेत एका बेघराला गाडीखाली चिरडणारा अभिनेता सलमान खान या प्रकरणातून सहीसलामत सुटतो, यातून हेच सिद्ध होत असल्याचे मत काही विधिज्ञांनी व्यक्त केले.न्यायव्यवस्थेमधील राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याची खंत काही वकिलांनी व्यक्त केली. त्याच वेळी काहींच्या मतानुसार, कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना न्यायव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. न्यायव्यवस्थेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्याही स्थितीत अन्य देशांमधील न्यायव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय न्यायव्यवस्था खूप सक्षम तर आहेच, पण निष्पक्षही आहे, असे मत काही कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले.मीडियासमोर बोलणे ही चूकचसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीररीत्या आरोप केल्यामुळे लोकांमध्ये अतिशय चुकीचा संदेश गेला आहे. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास नष्ट होईल. न्यायमूर्तींनी त्यांच्या अडचणी कोलेजियमसमोर मांडणे अभिप्रेत होते. शेवटचा मार्ग म्हणून राष्ट्रपतींचा पर्यायही उपलब्ध होता. कोणत्या न्यायमूर्तींकडे कोणते खटले सोपवायचे, ही पूर्णत: प्रशासकीय बाब आहे. ती समस्या चार भिंतीच्या आड सोडवणे शक्य होते.-रघुनाथ चोरगे,निवृत्त महानगरदंडाधिकारीन्याय विकत घ्यावा लागतोन्यायदानाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अवघड झाली आहे. न्यायव्यवस्थेची परिस्थिती एवढी बिकट आहे की, गोरगरिबांनी न्यायालयाची पायरी चढावी की नाही, असा प्रश्न पडतो. आजकाल न्याय विकत घ्यावा लागतो. कोपर्डी आणि निर्भयासारख्या काही प्रकरणांमध्ये गोरगरिबांना न्याय मिळतो, पण तो जनतेने आवाज उठवल्यानंतर. अन्यथा, न्याय मिळेल, याची शाश्वती नसते. सलमान खानच्या प्रकरणामध्ये उभ्या देशाने ते अनुभवले आहे.- अ‍ॅड. हेमलता देशमुखजनसामान्यांनी कुणाच्या दरबारात जावे?सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरच आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार परिषद घेण्याची वेळ येणे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. चोहोकडून निराशा पदरी आली की, सामान्य माणूस न्यायालयाची पायरी चढतो. आता सर्वोच्च न्यायालयालाच न्याय मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर जावे लागत असेल, तर सामान्यांनी कुणाच्या दरबारात जावे.-सिद्धविद्या, सुप्रसिद्ध विधिज्ञराजकीय हस्तक्षेप वाढलान्यायव्यवस्थेमधील राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. राजकीय दबावामुळे काम करणे अवघड झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या अडचणी योग्य वाटतात. न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार नगण्य आहे. कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना न्यायव्यवस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे.- नानासाहेब मोते,ज्येष्ठ वकीलकारभार पारदर्शक नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेले आरोप गंभीर आहेत. न्यायव्यवस्थेचा कारभार पारदर्शक राहिलेला नाही, हेच यातून स्पष्ट होते. सामाजिक संवेदना दिवसेंदिवस कमी होत असल्याचे ते द्योतक आहे. खटल्यांच्या वाटपावर न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. हा उपद्व्याप कशा प्रकारच्या तडजोडींसाठी असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.-बी.एल. वाघमारे,सेवानिवृत्त, जिल्हा न्यायाधीश

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे