शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडीसोबतच न्यायालयीन चौकशी; घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 06:44 IST

शिंदे याच्या पाेलिस चकमकीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याबरोबरच सीआयडी स्वतंत्र चौकशी

ठाणे : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आराेपी अक्षय शिंदे याच्या पाेलिस चकमकीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याबरोबरच राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही (सीआयडी) स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी मंगळवारी दिली. हे संपूर्ण प्रकरण आता चाैकशीच्या अधीन असल्याने यावर भाष्य करणे गैर आहे, असेही त्यांनी  सांगितले. अक्षयने केलेल्या गुन्ह्याचा तपास सरकार नियुक्त विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरू हाेता. त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक छळवणुकीच्या आराेपाची ठाणे पाेलिसांकडून चाैकशी सुरू हाेती. याच गुन्ह्यात त्याचा तळाेजा कारागृहातून साेमवारी ताबा घेतल्यानंतर चकमकीचा प्रकार घडल्याची माहिती ठाणे पाेलिसांचे जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली.   पोलिस चकमकीत अक्षय जेथे मारला गेला ते मुंब्रा बायपास स्थळ आणि ज्या वाहनांत हा थरार घडला त्या पोलिस वाहनाचा मुंब्रा पोलिसांनी पंचनामा केला. त्या ठिकाणी न्यायवैद्यक विभागाच्या पथकानेही तपासणी केली. 

अक्षयवर पोलिसाच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा 

जे घडले, ते धक्कादायक आहे. अक्षयने पाेलिसांवर केलेल्या गाेळीबाराबद्दल त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दाेन गुन्हे मुंब्रा पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती डुंबरे यांनी दिली.

अतिरक्तस्रावाने मृत्यू

मुंबई : अक्षय शिंदेचा मृत्यू डोक्यात गोळी लागल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे झाल्याचा निष्कर्ष जेजे रुग्णालयाच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नोंदविण्यात आला आहे. त्याच्या डोक्याला एकच गोळी लागल्याचे अहवालात म्हटले आहे.

अक्षयचा मृतदेह मंगळवारी जेजे रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या शरीरात गोळी अडकलेली नाही ना, याची खातरजमा एक्स-रेद्वारे करण्यात आली. हॅण्डवॉश आणि व्हिसेराची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे. 

जवळचे कुणीही नव्हते

मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शवविच्छेदन करताना व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. अक्षयचे जवळचे कुणीही नातेवाईक रुग्णालयात उपस्थित नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विच्छेदनानंतर संध्याकाळी मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणेPoliceपोलिस