शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:22 AM

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. कपिल पाटील यांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने त्यांना राजकीय वारसा आपल्या वडिलांपासून लाभला. याची चुणूक त्यांनी कॉलेज जीवनातदेखील निवडणूक लढवून दाखवली होती. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात सन १९८८ पासून झाली.कपिल पाटील हे १९८८ साली प्रथम दिवे-अंजूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंच झाले. चार वर्षे ते सरपंच होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेऊन सन १९९२ मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवली. सन २००२ मध्ये काल्हेर-अंजूर गटातून निवडणूक लढवून ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. या सर्व निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे लढवल्याने ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. २००५-०७ दरम्यान उपाध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण विभागात आपला ठसा उमटवला आणि याच काळात त्यांच्यातील उत्तम वक्ता घडला. त्यानंतर, २००९ मध्ये ते ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. हीच कारकीर्द त्यांना खासदारकीच्या निवडणुकीत यश देण्यास कारणीभूत ठरली. त्यातच, ते काही वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते. मात्र, २०१४ मध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वारे पाहून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि मोदीलाटेचा फायदा घेत निवडून आले. कार्यकर्त्यांची टीम आणि विकासकामांचा पाठपुरावा करण्याची धमक ठेवत त्यांनी आपली प्रतिमा बनवली.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाविरोधात वातावरण असताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून त्यांनी अभूतपूर्व विजय मिळवला.>भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाऊलभिवंडी लोकसभा क्षेत्रातील खाजगी व सार्वजनिक वाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम हाती घेतले आहेत.खासदार होताच त्यांनी भिवंडीतील उड्डाणपुलांना चालना दिली. तर, एमएमआरडीएच्या माध्यमांतून शहरात ५२ आरसीसी रस्ते बनवून महानगरपालिकेचा भार हलका केला. जकात बंद झाल्याने पालिका डबघाईला आली असताना शहरातील मागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी डांबरी रस्त्यांऐवजी आरसीसी रस्ते बनवले. त्यामुळे पालिकेच्या खर्चात करोडो रूपयांची बचत झाली आहे.>शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल : साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या सर्वांतून समाजाची अभिरुची घडत असते आणि सुसंस्कृत समाज तयार होत असतो, त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील उत्सवांना पुढाकार देऊन या उत्सवांना भेटी देत त्यांचा उत्साह वाढवला. कल्याण पश्चिममध्ये त्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सन २०१४ पासून सुरू केला. तर, भिवंडीसह मतदारसंघातील साजºया होणाºया शिवजयंती उत्सवांना आवर्जून भेटी दिल्या. उत्सव ही परंपरा मानत त्यांनी सर्व जातीधर्मांच्या उत्सवांना प्रोत्साहन दिले.>लोकसेवेचा वसा :वडिलांकडून मिळवलेला लोकसेवेचा वसा ग्रामपंचायतीपासून ते खासदार बनण्यापर्यंत कायम ठेवला असून भिवंडी लोकसभा मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा वसा त्यांनी अंगीकारला आहे. त्यामधून पॉवरलूम, गोदामहब अद्ययावत सरकारी रूग्णालये आणि इतर सोयींकडे त्यांचे जास्त लक्ष असून ते त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामधून मोठा रोजगार या मतदारसंघात निर्माण होणार आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९