शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड यांना अटक, रात्र पोलीस कोठडीतच; चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकाला मारहाण करणे भाेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 05:26 IST

ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली.

ठाणे :

ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. अटकेनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यातच वेळ गेल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आव्हाडांसह १२ कार्यकर्त्यांची शुक्रवारची रात्र पोलीस कोठडीतच गेली.ठाण्यातील मॉलमधील  ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षक दाम्पत्याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड, तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह १०० जणांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. आव्हाड यांच्यासह परांजपे, तसेच अन्य नऊ अशा ११  जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करीत त्यांच्या सुटकेची मागणी केली. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे एक वाजता त्यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांचा फोन आला. नोटीस देण्यासाठी मी माणूस पाठवतो,  नाहीतर तुम्ही पोलीस ठाण्यात या, असे निकम त्यांना म्हणाले. त्यावर आव्हाड यांनी आपण मुंबईला जायला निघाल्याने आपण पोलीस ठाण्यात येऊन नंतर मुंबईला जाऊ, असे मान्य केले. पोलीस ठाण्यात गेलेल्या आव्हाड यांना निकम यांनी गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. वागळे इस्टेट परिमंडळाचे  पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड हे अल्पावधीत तेथे पोहोचले.  त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर आपल्याला अस्वस्थता, तसेच हतबलता दिसत होती. आपण काही करू शकत नाही. वरून आदेश आल्याने तुम्हाला अटक करावी लागेल, असेही राठोड म्हणाल्याचा उल्लेख आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये केला.

हा पोलीस बळाचा गैरवापर आहे. मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल; पण मी जे केले नाही,  तो गुन्हा मी कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी आपल्या अटकेनंतर ट्विटद्वारे व्यक्त केली.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड