शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

डोंबिवलीतील ज्वेलर्स मालक, कारागिरांची 3 कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:46 IST

डोंबिवली येथे राहणारे सचिन चव्हाण यांचे रेणुका ज्वेलर्स नावाने नवीन पनवेल येथे दुकान आहे. उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो यांचा झवेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे.

नवीन पनवेल : मुंबईच्या झवेरी बाजार येथील उत्तम व गौतम सामंतो यांनी सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ३ कोटी ५८ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. सामंत बंधूंच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डोंबिवली येथे राहणारे सचिन चव्हाण यांचे रेणुका ज्वेलर्स नावाने नवीन पनवेल येथे दुकान आहे. उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो यांचा झवेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. एप्रिल २०१९ मध्ये सुब्रतो मंडल या कारागिराच्या माध्यमातून चव्हाण यांनी सामंतो यांना वेगवेगळ्या साईजचे सोन्याचे गंठण आणि नेकलेस बनवून देण्यासाठी दोन किलो ३० ग्रॅम शुद्ध सोने दिले होते. या वेळी सामंतो बंधूंनी एक महिन्यामध्ये दागिने बनवून देतो, असे सांगितले. महिन्याभरानंतर चव्हाण यांनी मंडल यांच्याकडे दागिन्यांबाबत विचारणा केली असता सामंतो बंधूंनी त्याच्याकडे इतर दागिन्यांची ऑर्डर असल्याचे सांगितले. चव्हाण यांना दागिने हवे असल्याने त्यांनी मे २०१९ मध्ये शामल मेटे या दुसऱ्या कारागिराला सोने दिले.

शामल मेटे यांनी सामंतोंकडेच दागिने बनवण्यासाठी दिले. त्यानंतर चव्हाण यांनी जुलै २०१९ मध्ये कारागीर स्वपन सामंतोकडे मंगळसूत्र बनवण्यासाठी ७१० ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. तसेच सप्टेंबर २०१९ मध्ये श्यामसुंदर आदक यांच्याकडे ५६० ग्राम सोने दिले होते. त्यानंतर भारत दादा पुजारीला मंगळसूत्र बनवण्याची ऑर्डर देऊन ३४७ ग्रॅम शुद्ध सोने दिले होते. आणि अर्जुन शंकर पंडित याला मंगळसूत्र आणि हार बनविण्यासाठी एक किलो ८२९ ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. अशा पद्धतीने चव्हाण यांनी वेगवेगळ्या कारागिरांना तीन कोटी ८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे तब्बल सहा किलो ७४९ ग्रॅम शुद्ध सोने दिले. मात्र, सर्व कारागिरांनी ते मुंबईतील झवेरी बाजारातील सामंतो बंधूंच्या कारखान्यात दागिने बनविण्यासाठी दिले. त्या वेळी सामंतो बंधूंनी कारणे सांगून त्यांनी तयार केलेले दागिने देण्यास टाळाटाळ केली.

फोन घेणेसुद्धा केले बंदमार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याचे कारण सांगत सामंतो बंधूंनी कारखाना चालू होताच सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरदेखील त्यांनी सचिन चव्हाण आणि इतर कारागिरांचे सोने आणि दागिने दिले नाहीत. तसेच त्यांचे फोन घेणेसुद्धा बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सामंतो बंधूंनी अशाच पद्धतीने १० ते १५ ज्वेलर्स आणि कारागिरांकडून सोने घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGoldसोनं