शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

जामसरचा हेरिटेज तलाव वेटलॅण्ड घाेषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:16 AM

केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती.

हुसेन मेमनn  लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या जामसर गावाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हेरिटेज तलावाला पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. यासंबंधीचा पाणथळ व जैवविविधता संरक्षण, संवर्धनाबाबत शाश्वत विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये जामसर तलावाचा समावेश होता. जामसर तलावाचा उल्लेख नॅशनल वेटलॅण्ड ॲटलासमध्येही असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ तसेच ४८ नुसार प्रत्येक नागरिकाचे तसेच शासनाचे निसर्गसंवर्धन करणे, हे प्राथमिक व मूलभूत कर्तव्य असल्याने ग्रामस्थांनी हा तलाव वेटलॅण्ड म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक ठराव ऑक्टोबरमध्ये घेतला.गावातील जैवविविधता, प्राचीन स्थळांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने जामसर पाणथळ आणि जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सल्ला देण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याचेही ठरवले आहे. असा निर्णय घेणारी जामसर ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बफर झाेनमध्ये ५९ वनस्पतीजामसर तलावाच्या बफर झोनमध्ये ५९ वनस्पतींचे अस्तित्व आढळले आहे. त्यापैकी १० दुर्मीळ, दोन अतिदुर्मीळ व एक असुरक्षित प्रजाती आहे. त्यांचे जतन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील दोन अभ्यासकांनी जामसर वेटलॅण्डजवळ पुरातत्त्वीय संशाेधन केले असता तेथे ११४ कलाकृती सापडल्या आहेत. तसेच तलावाजवळ एक मोठा पुराणकालीन रस्ता सापडला असून व्यापारासाठी या मार्गाचा वापर होत असावा. त्यामुळे हे स्थळ पर्यटन व अध्ययन क्षेत्र घाेषित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.