अखंड भारताचे स्वप्न राज यांनी पूर्ण करावे जैन धर्मगुरूची मागणी

By अजित मांडके | Updated: January 21, 2023 15:12 IST2023-01-21T15:12:07+5:302023-01-21T15:12:27+5:30

अखंड भारत हें बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होत. ते राज ठाकरे यांनी पूर्ण करावे. अशी आमची अपेक्षा जैन धर्मगुरूंनी राज यांच्याकडे व्यक्त केली.

Jain Guru's demand that Raj should fulfill the dream of an unbroken India | अखंड भारताचे स्वप्न राज यांनी पूर्ण करावे जैन धर्मगुरूची मागणी

अखंड भारताचे स्वप्न राज यांनी पूर्ण करावे जैन धर्मगुरूची मागणी

ठाणे : अखंड भारत हें बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होत. ते राज ठाकरे यांनी पूर्ण करावे. अशी आमची अपेक्षा जैन धर्मगुरूंनी राज यांच्याकडे व्यक्त केली. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील जैन मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हें  शनिवारी सकाळी उपस्थितीत होते. विशेष म्हणजे राज यांचे आगमन होताच   मंदिरामध्ये जय जय महाराष्ट्र माझा आणि आया है राजा ही गाणी लावून तसेच फुले ही उधळून जैन समाजाच्या वतीने राज यांचे स्वागत करण्यात आले.

 राज ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा आहे. ही अपेक्षा छोटी नाहीतर खूप मोठी आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करावे. महाराष्ट्र आणि भारताबद्दल बोलत नाही तर अखंड भारत हे आमचे स्वप्न आहे. कश्मीर अर्धा आपल्या ताब्यात आला आहे. आम्हाला पूर्ण कश्मीर हवा आहेच. पण, त्याचबरोबर पाकिस्तानही हवा आहे. अखंड भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते. हे स्वप्न तुम्ही पुर्ण करा. त्यासाठी आता आम्ही तुमचे स्वागतही केले आहे, असे जैन धर्मगुरु आचार्य चितानंद महाराज यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा आनंदमठ आहे. मधल्या काळात शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात यावरून वादही झाला होता.

येथून आता बा‌ळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. परिणामी ठाण्याच्या राजकारणात टेंभीनाका परिसराला मोठं राजकीय महत्व आहे. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या भागात समाजाचे मोठे मंदीर आहे. या मंदीरामध्ये जैन समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीती लावली. त्यांच्या स्वागतासाठी जैन समाज मोठ्या संख्येने मंदीर परिसरात हजर  होता. जैन समाजाने  त्यांचे मोठ्या जोशात  स्वागत केले. राज यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर ते मंदीरामधील सभा मंडपातील कार्यक्रमस्थळी आले. तिथे जय जय महाराष्ट्र माझा आणि आया है राजा अशी गाणी लावून तसेच त्यांच्यावर फुले उधळून  राज यांचे स्वागत करण्यात आले .राज यांनी मंदिरात आरती ही केली.

Web Title: Jain Guru's demand that Raj should fulfill the dream of an unbroken India

टॅग्स :thaneठाणे