शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

ठाण्यात प्रथमच भरणार ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा, मराठी ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 16:44 IST

गोल्डा मेयर यांच्या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देठाण्यात प्रथमच ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळामराठी ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार उपस्थित राहणार

ठाणे : ठाण्यात प्रथमच ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा भरणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स आयोजित सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर लिखित "गोल्डा: एक अशांत वादळ" या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दूतावासातील उप- मुख्याधिकारी निमरोद कलमार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाण्यात राहणारे जु धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा भरणार आहे. 

मराठी ग्रंथ संग्रहालयाने ठाणे शहराला विविध कार्यक्रम आयोजित करून ठाणे शहराला बौद्धिक मेजवानी दिली आहे. तसेच वाचकांसाठी देखील अनेक उपक्रम राबवले आहेत. मंगळवारी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करून एक नवीन पायंडा मराठी ग्रंथ संग्रहालय घालत आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने इस्त्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे लेखन सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर यांनी केले आहे. "गोल्डा: एक अशांत वादळ" या शिर्षकाच्या या पुस्तकाचे सुप्रसिध्द मुक्त पत्रकार निळू दामले यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला इस्त्रायलचे उप-मुख्याशिकारी निमरोद कलमार हे उपस्थित राहतील, यावेळी ठाणे शहरात शेकडो वर्षापासून वास्तव करणारे जू धर्मिय मराठी भाषिकांचा प्रथमच साहित्यिक-सांस्कृतिक मेळा भरणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने शहरातील ज्यू धर्मिय मराठी भाषिक एकाच छताखाली येणार आहेत. मंगळवार, दि. २३ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता, नेताजी सुभाष पथ, ठाणे(पश्चिम) येथे होणार्‍या या विनामूल्य कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इंडस सोर्स बुक्सच्या प्रकाशिका सोनवी देसाई, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह संजय चुंबळे, महादेव गायकवाड, चांगदेव काळे, अनिल ठाणेकर यांनी केले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणcultureसांस्कृतिक