लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : नाशिकसाठी परवानगी मागून ठाण्यात सुरू केलेल्या आयव्हीएफ केंद्रावर ठाणे महापालिका आणि बदलापूर पाेलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाण्यातील सर्व आयव्हीएफ आणि साेनाेग्राफी केंद्रांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आराेग्य विभागाने सहा विशेष पथके नेमली आहेत. याद्वारे बेकायदा आयव्हीएफ आणि साेनाग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे.
बदलापूर येथील बेकायदा स्त्री बीज विक्री प्रकरणानंतर ठाणे महापालिकेचा आराेग्य विभागही सतर्क झाला. बदलापूरमधील आराेपींच्या चाैकशीतून ठाण्यातही एक आयव्हीएफ केंद्र बेकायदा पद्धतीने सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य वैद्यकीय आराेग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील आणि डाॅ. वर्षा ससाणे यांच्या पथकाने १९ फेब्रुवारीला ठाण्यातील गावदेवी येथील मालती आयव्हीएफ सेंटरवर कारवाई केली. नाशिकसाठी परवानगी मागून हे केंद्र ठाण्यात सुरू केले हाेते. महिलांच्या आराेग्याशी आणि वैद्यकीय प्रक्रियेशी संबंधित संवेदनशील बाबींचा गैरवापर हाेणार नाही याकडे लक्ष दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आराेग्य विभागाने दिली.
पैशांच्या आमिषाने गरीब, गरजू महिलांची परवानगी घेत त्यांच्या स्त्री बिजात अनधिकृतपणे वाढ करण्यासाठी इंजेक्शन दिले जात असल्याचे ठाण्यातील एका केंद्रावर आढळले. त्यामुळे यापुढे भरारी पथकांद्वारे एआरटी आणि साेनाेग्राफी केंद्रांची तपासणी हाेणार आहे. गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणार.डाॅ. प्रसाद पाटील, मुख्य वैद्यकीय आराेग्य अधिकारी, ठाणे महापालिका
तपासणी कशाची ?ठाणे महापालिका हद्दीत सध्या ११ असिस्टेड रिप्राेडक्टिव्ह टेक्निक (एआरटी) केंद्रे आणि २५९ साेनाेग्राफी केंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय नियमांचे पालन हाेते का, रुग्णांची याेग्यप्रकारे नाेंद हाेते का, उपचार प्रक्रियेत काही अनियमितता आहे का, याची सखाेल पडताळणी केली जाणार आहे. स्त्री बीज दान प्रक्रिया, रुग्णांकडून घेतलेली कागदपत्रे तसेच वैद्यकीय परवानग्यांचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, आयव्हीएफ केंद्र, प्रसूती रुग्णालयांचीही तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Summary : Following an illegal egg sale in Badlapur, Thane Municipal Corporation is inspecting IVF and sonography centers. Six teams are checking for irregularities, patient records, and adherence to medical norms. An IVF center operating without proper permits was already raided.
Web Summary : बदलापुर में अवैध अंडाणु बिक्री के बाद, ठाणे नगर निगम आईवीएफ और सोनोग्राफी केंद्रों का निरीक्षण कर रहा है। छह टीमें अनियमितताओं, रोगी रिकॉर्ड और चिकित्सा मानदंडों का पालन की जांच कर रही हैं। बिना अनुमति के चल रहे एक आईवीएफ केंद्र पर पहले ही छापा मारा गया।