शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

मालमत्ताकर : ५० टक्के सवलतीचा सत्ताधाऱ्यांचा बार फुसका, नागरिकांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:18 IST

१३ ऑगस्ट रोजी झालेल्या ऑनलाइन महासभेत नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कर भरल्यास ५० टक्के कर माफ तर आधीची थकबाकीही भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे १०० टक्के माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता.

मीरा राेड :मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मालमत्ताकरात ५० टक्के सवलत आणि थकबाकीवरील व्याजात १०० टक्के माफी देण्याचा ठराव करून दोन महिने झाले, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा बार फुसका ठरल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. तर, प्रशासन २० ते २५ टक्के सवलत देण्यास तयार असतानाही एका नेत्याच्या अट्टहासामुळे तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी नाराजी भाजपतील काही मंडळी बोलून दाखवत आहेत. 

१३ ऑगस्ट रोजी झालेल्या ऑनलाइन महासभेत नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कर भरल्यास ५० टक्के कर माफ तर आधीची थकबाकीही भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे १०० टक्के माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. काँग्रेस व शिवसेनेने मात्र मालमत्ताकरात १०० टक्के माफी द्या, अशी मागणी केली. दुसरीकडे थकबाकीदारांना १०० टक्के व्याजमाफी म्हणजे बड्या करबुडव्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप झाला. प्रशासनाने मात्र करात २० ते २५ टक्के सवलत देण्याची तयारी दाखवली असता ती सत्ताधाऱ्यांनी अमान्य केल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी तो ठरावच रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठविला. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांना पूर्ण कर घेण्याचा आज अधिकार नाही. म्हणून सरकारचा निर्णय येत नाही, तोपर्यंत कर भरू नका, असे आवाहन नागरिकांना केले होते. मेहता यांच्यापाठोपाठ भाजपच्या काही पालिका पदाधिकाऱ्यांनीही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पालिकेचा करसवलतीचा ठराव सरकारने मंजूर करावा, असे साकडे घातले. त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी टीका केली होती. कर भरण्यासाठी जाणाऱ्यां नागरिकांना पूर्ण कर भरावा लागत आहे.सवलत मागितल्यास तसा आदेश आला नसल्याचे सांगितले जाते.

... तर पक्षाची कोंडी झाली नसती -सरकारवर खापर फोडण्याच्या राजकारणात भाजपतील एका नेत्यासह त्याच्या समर्थकांनी नागरिकांचे नुकसान केले आहे. पालिका आयुक्त २० ते २५ टक्के सवलत देण्यास तयार झाले होते. त्यातही निवासी मालमत्तांना ५० टक्के सवलत देण्यासाठी वाणिज्य मालमत्तांची सवलत २० ते २५ टक्के केली असती आणि थकबाकीवरील १०० टक्के व्याजमाफी वगळली असती, तर नागरिकांना दिलासा देता आला असता आणि पक्षाची कोंडी झाली नसती, असे भाजपमधील काही जाणकारांनी बोलून दाखवले.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा