ठाण्यात लोखंडी होर्डिंग स्टँड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST2021-09-12T04:46:25+5:302021-09-12T04:46:25+5:30

ठाणे : ठाणे शहरातील तलाव पाळीसमोर शिवाजी मैदानाबाहेर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेले लोखंडी होर्डिंग स्टँड अचानक शनिवारी दुपारच्या सुमारास ...

Iron hoarding stands collapsed in Thane | ठाण्यात लोखंडी होर्डिंग स्टँड कोसळले

ठाण्यात लोखंडी होर्डिंग स्टँड कोसळले

ठाणे : ठाणे शहरातील तलाव पाळीसमोर शिवाजी मैदानाबाहेर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेले लोखंडी होर्डिंग स्टँड अचानक शनिवारी दुपारच्या सुमारास जोराने आलेल्या हवेने कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू असून हवेचा वेग मध्येच कमीजास्त होत आहे. त्याच हवेमुळे तो स्टँड अचानक पडला. त्या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले होर्डिंग तातडीने हलविले. हा होर्डिंग स्टँड तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात होता. त्याच्या आजूबाजूला भाजी विक्रीसाठी फुटपाथवर महिला बसल्या होत्या. ज्यावेळी पडला त्यावेळी कोणीही त्या स्टँडच्या खाली बसले नव्हते. तसेच रस्त्यावरून वाहने ये-जा करत नव्हती. त्यामुळे मोठी हानी टळली.

Web Title: Iron hoarding stands collapsed in Thane