इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडीत घेणार, खंडणीविरोधी पथकाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:44 IST2017-12-12T00:44:02+5:302017-12-12T00:44:18+5:30
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. गोराई येथील एका जागेच्या वादातून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.

इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडीत घेणार, खंडणीविरोधी पथकाची तयारी
ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. गोराई येथील एका जागेच्या वादातून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.
गोराई येथील ३८ एकर जमिनीच्या विक्रीचा सौदा बिल्डरने एका व्यावसायिकाशी केला होता. त्यासाठी व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली होती. जमीनविक्रीचा पूर्ण व्यवहार होण्यास जवळपास दोन वर्षे लागली. दरम्यानच्या काळात भाव वधारले आणि जमिनीच्या विक्रीवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा गैरफायदा घेऊन इक्बाल कासकरने ३ कोटी रुपयांची खंडणी बिल्डरकडून उकळली. २०१५-१६ चे हे प्रकरण असून जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी इक्बाल कासकर आणि इतर आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. छोटा शकील आणि अनिस इब्राहिमची नावेही यावेळी समोर आली.
कासकरविरुद्ध ठाण्यात खंडणीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक कासारवडवली येथे, तर दोन ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणि आता गोराई येथील जागेच्या वादासंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात इक्बालला पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिली.