शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

आवक -जावक रजिस्टर फाडले,शिक्षण विभागाच्या नोंदी गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:33 AM

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या.

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. या दरम्यान सुमारे चार ते पाच महिन्यांच्या नोंदी असलेले आवक-जावक रजिस्टर फाडून पत्रव्यवहारांचा पुरावा नष्ट करण्याची मनमानी माध्यमिक शिक्षण विभागात झाल्यामुळे या गौडबंगालाविषयी जिल्हा परिषदेत तर्कवितर्क काढले जात आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचे कामकाज मीना शेंडकर या महिला शिक्षणाधिकाºयांव्दारे पाहिले जात होते. त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त काम होते. परंतु, त्यांच्या बदलीनंतर आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागास शिक्षणाधिकारी मिळाले. या दोन्ही अधिकाºयांनी सुमारे दोन महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारला. मात्र, माध्यमिक शिक्षण विभागाच्या या आधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आवक-जावक नोंदींच्या रजिस्टरचे चार ते पाच महिन्यांची पाने सील करून त्या पुढे नवीन पत्रव्यवहारांच्या नोंदी ठेवण्याचे सूचना होत्या. परंतु, काही दिवसांनी मात्र सील केलेल्या पत्रव्यवहाराची पानेरजिस्टरमधून फाडण्यात आल्याची गंभीर बाब लक्षात आली.>अधिकारी-कर्मचारी सीसीटीव्हीत कैदमाध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाची झाडाझडती सुरू असून या काळातील सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाल्याची चर्चा आहे. यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यापूर्वी कॅमेºयासमोर आढळले. काही वेळेनंतर कॅमेरे सुरू केले असता त्याच व्यक्ती कॅमेºयासमोर आढळल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यावरून संबंधितांकडे संशयाची सुई फिरत आहे..जि.प. अध्यक्षाही अंधारातसुमारे चार ते पाच महिन्यांच्या पत्रव्यवहारांच्यां नोंदी असलेल्या या रजिस्टरचा विषय सध्या गंभीर झाला आहे. याचा अहवाल तयार होऊनही संबंधित अधिकाºयांवर कारवाई होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी विचारणा केली, पण त्यांनाही गोंधळाची कल्पना वरिष्ठ अधिकाºयांसह स्वीय सहाय्यकांकडून कळली नसल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.>शेकडो शिक्षकांसह शाळांना होणार त्रासआवक- जावक रजिस्टरमधील फाडलेल्या पानांमध्ये कोणत्या संवेदनशील व अतिसंवेदन नोंदी होत्या, याविषयी उत्सुकता लागली असून, पद भरती, नियुक्ती, आदींच्या पत्रव्यवहाराबाबत अंदाज बांधले जात आहेत.याबाबत नवनिर्वाचित माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.या रजिस्टर विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलण्याचा सल्ला बढे यांनी दिल्यामुळे या घटनेतील गांभीर्य गंभीर असल्यचे उघड होत आहे. मुख्यकार्यकारी अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.कर्मचाºयांमध्ये संतापआवक-जावक रजिस्टरमधील पाने फाडणाºया दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यासही विलंब झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींचा गॉडफादर कोण याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे उपसंचालक यांच्या निदर्शनात आणले आहे.