शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामधील अंतर्गत असंतोष उफाळला; सेेटिंग होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 21:51 IST

स्वपक्षाच्या कारभारावर उठवली टीकेची झोड

मीरारोड - स्वच्छ प्रभागाचे बक्षिस जाहीर करत नाहीत, डेंग्यूने मृत्यु झालेल्या मुलीच्या प्रश्नावर उत्तर नाही, स्वत:ची सेटींग करुन निघून जातात, आम्ही काय फक्त ठरावांवर हातच वर करायचे का ? असे एकापाठोपाठ एक घणाघाती हल्ले भाजपाच्या नगरसेवकांनी स्वपक्षीयांवरच केल्याने भाजपातील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या नगरसेवकांनी आयुक्तांचीही झाडाझडती घेत संताप व्यक्त केला.आज शनिवारच्या महासभेनंतर २०१७-१८ च्या स्वच्छता सर्वेक्षणातील विजेत्या प्रभागांची नावं व पुरस्कार जाहीर केली जातील अशी खात्री भाजपाचे प्रभाग ५ मधील नगरसेवक मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंग यांना होती. परंतु महापौर डिंपल मेहतांनी सभा तहकूब करत त्यांच्यासह उपमहापौर निघून गेले. त्याचवेळी आयुक्त बालाजी खतगावकरसुद्धा सभागृहातून बाहेर पडत असताना संतापलेल्या मुन्ना यांनी त्यांना अडवत विजेत्या प्रभागांची नावं जाहिर का केली नाहीत याबद्दल जाब विचारला. मुन्ना यांनी आयुक्तांशी चढ्या आवाजात बोलण्यास सुरवात केल्याने आयुक्त तिथून निघून गेले.यानंतर मुन्ना यांच्यासह भाजपा नगरसेवक अशोक तिवारी यांनी आयुक्तांना बोलावून नावं जाहीर करत नाहीत तोपर्यंत बाहेर जााणार नाही असे म्हणत ठिय्या दिला. त्यामुळे नगरसेवक मदन सिंग, नगरसेविका वंदना मंगेश पाटील, माजी महापौर गीता जैन आदी सर्व गोळा झाले.यावेळी वंदना पाटील यांनी संताप व्यक्त करत, डेंग्यूने मुलीचा मृत्यू झाला त्यावरदेखील उत्तर दिले नाही. फक्त ठराव संमत करण्यासाठी हात वर करायला सांगतात, असा संताप व्यक्त केला. तर कामांची वाट लागली आहे. पूर्वी कामं व्हायची. आज कामं होत नाहीत, अशा शब्दांमध्ये अशोक तिवारी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.मुन्ना सिंग यांनी तर, सर्व आपल्या परिने सेटींग करुन आणि मनाला वाटलं तेव्हा सभा तहकूब करुन निघून जातात. त्यांची कामं झाली की झालं. सर्व मिळालेले आहेत. पाणी नाही, औषधं नाहीत. पण करोडो रुपये खर्च होत आहेत. आधी २४ तासांची कपात असायची आता ३० तास झाली. आठवड्यातून दोन दिवस पाणी मिळते. लोकांना आम्हाला उत्तरं द्यावी लागतात. सत्ता पचवता येत नाही, असे त्यांनी महापौरांसह स्वपक्षाच्या नगरसेवकांना सुनावले.सभापती रवी व्यास, गीता जैन, ध्रुवकिशोर पाटील यांनी समजूत घातल्यावरही सिंग व तिवारी ऐकण्यास तयार नव्हते. अखेर उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना पाचारण करण्यात आले. पानपट्टे यांनी शासनाकडून नावं अंतिम झाली नसल्याचं सांगत समजूत काढल्यानंतर हे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. या भाजपा नगरसेवकांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे स्थानिक भाजपा नेतृत्वाची पंचाईत झाली आहे. पक्षात सर्वकाही आलबेल नसून अंतर्गत असंतोष या निमित्ताने उफाळून आला आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक