शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

‘इंटरसेप्टर व्हेइकल’मुळे अपघातांवरही नियंत्रण, मद्यपी वाहनचालकांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:10 AM

ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमेऱ्यासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेइकल या दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

जितेंद्र कालेकर महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमेऱ्यासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेइकल या दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद...ठाणे पोलिसांच्या ताफ्यात नव्याने समावेश झालेल्या इंटरसेप्टर व्हेइकल स्पीडगन विथ कॅमेºयाची काय वैशिष्ट्ये आहेत?या अत्याधुनिक वाहनांच्या स्पीडगनद्वारे रोडवर लेझरचा पॉइंट निघतो. त्याच पॉइंटच्या आधाराने भन्नाट वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांना याद्वारे अचूक टिपले जाणार आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे सर्व्हरद्वारे त्याची आरटीओकडे असलेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीचे नियम तोडणाºया संबंधिताच्या मोबाइलवर अवघ्या पाच मिनिटांमध्येच ई-चलनाच्या कारवाईचा संदेश पाठविला जाणार आहे.या वाहनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल?सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम तोडणाºयांविरुद्ध कोणताही वाद होणार नाही. पुराव्यासहित ई-चलनाद्वारे जादा वेगावर, फोनवर बोलणाºयांवर कारवाई झाल्याने अशा गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होईल. पर्यायाने, अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात येईल.ठाण्यात कोणत्या ठिकाणी या वाहनांद्वारे कारवाई केली जाईल?घोडबंदर रोड, खारेगाव, मुंब्रा बायपास, भिवंडीतील रांजनोली, पिंपळासफाटा, शीळफाटा, कल्याणफाटा आदी ठिकाणांवर ही वाहने उभी केली जाणार आहेत. वेगाने आणि वाहन चालविणारे मद्यपी याठिकाणी अधिक असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.।इंटरसेप्टर व्हेइकलचा आणखी काय फायदा होणार आहे?या वाहनांमध्ये ब्रिथ अ‍ॅनालायझरची यंत्रणाही बसविलेली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्य प्राशन केले, याचा अहवालही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाºयांवर कारवाई करणे, त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.थेट ३०० मीटर रेंजमधून यातील स्पीडगनमधून फोटोसहित चलन फाडले जाणार आहे. सध्या या वाहनांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच सर्व्हरचीही तपासणी सुरू आहे. त्यामुळे अजून त्याद्वारे कारवाई केलेली नाही.