उल्हासनगर संच्युरी रेयान कंपनीच्या वतीने आंतरविभाग क्रिडा स्पर्धा

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2023 16:50 IST2023-02-21T16:49:07+5:302023-02-21T16:50:17+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरातील संच्युरी कंपनीने आंतरविभाग क्रीडा स्पर्धेचे आयोजन रामलीला मैदानात केले.

Inter Department Sports Competition on behalf of Ulhasnagar Sanctuary Rayon Company | उल्हासनगर संच्युरी रेयान कंपनीच्या वतीने आंतरविभाग क्रिडा स्पर्धा

उल्हासनगर संच्युरी रेयान कंपनीच्या वतीने आंतरविभाग क्रिडा स्पर्धा

उल्हासनगर : शहरातील संच्युरी रेयाँन कंपनीच्या वतीने आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कंपनीच्या रामलीला मैदानांवर आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन कंपनीचे व्हाँईस प्रेसिडेन्ट मिलींद भंडारकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरातील संच्युरी कंपनीने आंतरविभाग क्रीडा स्पर्धेचे आयोजन रामलीला मैदानात केले. क्रीडा स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी क्रीडां स्पर्धेच्या उद्घाटन वेळी कंपनीचे उपाध्यक्ष शैलेंद्र तिवारी, बी.पी.कार्वा, ए.के.सहेल, आनंद ठाकुर ,राजा सेन, राजाराम राव, समीर सैनी यांच्यासह कंपनीतील ईतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 शहाड येथील संच्युरी रेयाँन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आंतरविभागीय क्रिडा स्पर्धा होणार आहे. यामध्ये कंपनीच्या रेयाँन विभागातील स्पिनिग, ए.टी.टेक्स्टाईल सी.एस.टू.केमिकल, मेन्टन्संस तसेच टायरकाँर्ड व ईतर आदी विविध विभागाचे कामगार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये क्रीकेट, फुटबॉल,हाँलीबाँल,खो-खो,कबड्डी आदि विविध खेळाच्या स्पर्धा होणार असल्याची माहिती संच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 

Web Title: Inter Department Sports Competition on behalf of Ulhasnagar Sanctuary Rayon Company