शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

मीरा भाईंदर महापालिकेतील संस्थानिक अधिकाऱ्यांची अखेर बदली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 22:57 IST

Mira Bhayander News : मीरा भाईंदर पालिकेच्या बांधकाम विभागात गेल्या २५  वर्षां पेक्षा जास्त काळ एकाच जागी तहान मांडून असणारे संस्थानिक मानले जाणारे वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर पालिकेच्या बांधकाम विभागात गेल्या २५  वर्षां पेक्षा जास्त काळ एकाच जागी तहान मांडून असणारे संस्थानिक मानले जाणारे वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेले सुरेश वाकोडे यांना बांधकाम विभागात खांबित यांच्या जागी नेमण्यात आले आहे . 

मीरा भाईंदर नगरपरिषद असताना ९४ - ९५ दरम्यान ठेका पद्धतीने दीपक खांबित हे कनिष्ठ अभियंता म्हणून कामास लागले होते . १९९७ साली मात्र ठाणे औद्योगिक न्यायालयातून आदेश आणून ते कायम कर्मचारी म्हणून शिरले . तेव्हा पासून बांधकाम विभागातच ते उपअभियंता व २००७ साला पासून आजतागायत कार्यकारी अभियंता ह्या पदावर काम करत होते . काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी खंबीत यांची बदलीचे आदेश दिले होते . त्यावेळी त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली गेली परंतु खांबित त्या विभागात हजरच झाले नाहीत . आणि काही दिवसातच त्यांनी बदली रद्द करून नाईक यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा बांधकाम विभागाचा कारभार हाती घेतला . 

 २००८ साली नगरसेवक असलेले चंद्रकांत वैती यांनी खांबित विरोधात आघाडी उघडली व सेवेतून निलंबित करण्याचा ठराव केला होता . ठराव मंजूर झाला . परंतु नंतर पुढच्या सभेत काही नगरसेवकांनी काही नेत्यांच्या वरदहस्तने खांबित यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव केला होता . 

खांबित यांच्या बदली साठी अनेकांनी तक्रारी केल्या परंतु त्यांची बदली वा त्यांच्यावर कार्यवाही मात्र होतच नव्हती . कारण अनेक नगरसेवकांसह काही नेते व काही मंडळीं यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने खांबित विरोधात ब्र काढत नसल्याचे आरोप केले जात आहेत . 

त्यातच गुरुवारी आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी मात्र खांबित यांची बांधकाम विभागातून उचलबांगडी करून चांगलाच धक्का दिला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात ठाण मांडून असणारे सुरेश वाकोडे यांना सुद्धा हटवून त्यांची बदली खांबित यांच्या जागी केली आहे . 

ह्या शिवाय प्रभाग समिती ५ चे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना कर निर्धारक संकलक पदाचा कार्यभार दिला असून संजय दोंदे यांना हटवून त्यांना प्रभाग समिती १ चे प्रभाग अधिकारी केले आहे . उद्यान विभागाच्या हंसराज मेश्राम व नागेश वीरकर यांची देखील अदला बदल केली आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक