शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धान्याऐवजी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:38 IST

रेशनिंग दुकानांव्दारे मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य पुरवठ्यासह रॉकेलचा पुरवठा शिधापत्रिकाधारकाना होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : रेशनिंग दुकानांव्दारे मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य पुरवठ्यासह रॉकेलचा पुरवठा शिधापत्रिकाधारकाना होत आहे. पण या ऐवजी या धान्यांसह रॉकेलच्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत काही ठिकाणी डीबीटीव्दारे रक्कम बँकेत जमा करण्यासाठी सहमती घेतली जात आहे. ती लवकरच ठाणेसह अन्य ठिकाणी लागू होईल, या भीतीपोटी डीबीटीला विरोध करण्यासाठी श्रमजीवी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.कॅश ट्रान्स्पर आॅफ फूड सबसिडी रूल- २०१५ हा केंद्र शासनाचा अद्यादेश आहे. यास अनुसरून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने अद्यादेश जारी केला आह. यानुसार मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातीलआझाद मैदान व महालक्ष्मी आदी ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानांवर या अद्यादेशाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर रावण्याचे सूचित केले आहे. पण ठाणे जिल्ह्यात कोठेही डीबीटी प्रकल्पाचा प्रयोग सुरू नसल्याचे सुतोवाच जिल्हापुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांनी सांगितले. पण सध्यातील हा डीबीटी प्रायोगिक प्रकल्प लवकरच सर्वत्र राबवण्याची भीती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा प्रवित्रा घेतला आहे.सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू असून लाभार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये डीबीटी कॅश हा पर्याय निवडल्यास शिधापत्रिकाधारकास तांदूळ व गहू या धान्याची रक्कम बँक खात्यात जमा होत आहे. लाभार्थ्यांस प्रति किलो तांदूळासाठी २६.६६ तर गव्हासाठी १९.३९ रूपये दोन्ही मिळूून ४६.३५ रूपये अनुदान बँक खात्यात जमा होते.।अत्योदयकार्डधारकाच्या खात्यात ८०७ रूपयेया डीबीटीव्दारे मध्ये अंत्योदयच्या लाभार्थी कुटुंबास सुमारे १७ किलो तांदूळ व १८ किलो गहू आदी ३५ किलो धान्याचा लाभ होत आहे. यासाठी सुमारे ८०७.६४ रूपये अनुदानाची रक्कम संबंधीत अंत्योदय लाभार्थी शिधापत्रिकाधारकाच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय संबंधीत दुकानदाराला त्यापोटी मिळणारे ५२.५० रूपये कमिशन मिळणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांप्रमाणे प्राधान्य कुटूंबाच्या लाभार्थ्यांस दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मिळतात. त्यांची ११२.३९ रूपये अनुदान बँक खात्यात जमा केले जाते. पण ही डीबीटी प्रकल्पच नको, गोरगरीब जनतेला त्यापासून अन्नधान्य मिळणार नाही, त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर त्याविरोधात आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहेत.

टॅग्स :bankबँक